Monday, May 27, 2024
HomeनगरMaratha Reservation : शिर्डीत मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण; मनोज जरांगे यांना पाठिंबा

Maratha Reservation : शिर्डीत मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण; मनोज जरांगे यांना पाठिंबा

शिर्डी (प्रतिनिधी)

सकल मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राहाता तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी सोमवारी शिर्डी येथे साखळी उपोषण सुरू करून शिर्डी व राहाता शहरात राजकीय सभा व कार्यक्रम घेण्यास विरोध केला आहे. शिर्डी येथे सुरू केलेल्या साखळी उपोषणाला परिसरातील अनेक गावातील तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी सकाळी 9 वाजता मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रांत अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरु केले. यावेळी सकाळ मराठा समाज बांधवांनी शिर्डी व राहाता शहरात राजकीय सभा किंवा कार्यक्रम घेऊ नये अशी ठाम भूमिका घेतली आहे. साखळी उपोषणासाठी ताराचंद कोते, शिर्डी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले, शिवसेनेचे विजय काळे, अनिल बोठे, विरेश बोठे, मुन्ना सदाफळ, महेश बोरकर, योगेश डांगे, वैभव कोते, सागर बोठे, विकास गोंदकर, प्रकाश गोंदकर, किरण गोंदकर, अविनाश गोंदकर, साई गोंदकर तसेच राहाता, शिर्डी, पिंपळवाडी, पुणतांबा, वाकडी, आडगाव, साकुरी, नांदूर्खी, निघोज, निमगाव कोर्‍हाळे व इतर गावातील तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेऊन या साखळी उपोषणात सहभाग घेतला.

यावेळी काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, रमेश गोंदकर, विजय जगताप, नितीन कोते, प्रभावती घोगरे, मनसेचे दत्तात्रेय कोते, डॉ एकनाथ गोंदकर, शिवाजी गोंदकर, सुजित गोंदकर, दत्ता कोते, गणेश कोते, अमोल सोमवंशी, अ‍ॅड कैलास शेजवळ, तसेच मुस्लिम समाज बांधवांनी भेट देऊन या उपोषणास पाठिंबा दिला. जोपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत शिर्डी येथे रोज सकाळी 9 ते 6 या वेळात साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचे माहीत सकल मराठा समाज बांधवांनी दिली.

पंतप्रधान मोदी आरक्षणाबाबत काही भाष्य करतील असे वाटले होते परंतु त्यांनी याबाबत काही भाष्य केले नाही. केंद्र व राज्य सरकार एका विचारायचे आहे. मग आरक्षण देण्यासाठी उशीर का? शासनाने उपोषणकर्त्यांचा संयम पाहु नये आरक्षण तात्काळ द्यावे. आरक्षणासाठी आत्महत्या होत असेल तर हे दुर्दैव असून संघर्ष करण्याची तयारी ठेवावी कोणीही आत्महत्या करू नये असे आ. बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथील साखळी उपोषणास भेटी प्रसंगी सांगितले.

शिर्डी हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी साईदर्शन घेण्यासाठी किंवा मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेत्यांनी आपले राजकीय जोडे बाहेर ठेवूनच यावे. परंतु शिर्डी व राहाता शहरात राजकीय सभा व कार्यक्रम घेण्यास आमचा विरोध आहे असे सकल मराठा समाज बांधवांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या