Saturday, May 4, 2024
Homeनगरशिर्डीच्या पावन भूमित साधू संतांच्या पदस्पर्शाने होणार परिक्रमा

शिर्डीच्या पावन भूमित साधू संतांच्या पदस्पर्शाने होणार परिक्रमा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा हयातीत असताना शिर्डी शिवेची परिक्रमा करत होते असा उल्लेख साई सतचरित्रात असून त्या धर्तीवर गेल्या तीन वर्षांपासून साई परिक्रमा उत्सव सुरू करण्यात आला आहे. दि. 13 मार्च रोजी या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

ग्रीन एन क्लीन शिर्डीच्या संकल्पनेतून शिर्डी साई परिक्रमेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. या परिक्रमेसाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील, साईसंस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे, खा. सदाशिव लोखंडे, महंत रामगिरी महाराज, महंत काशिकानंद महाराज, महंत उद्धव महाराज मंडलिक, उपासनी महाराज साकुरी यांच्या शिष्या, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत आदींसह साईभक्त उपस्थित असणार आहे.

शिर्डीतील खंडोबा मंदिरापासून दि. 13 मार्च रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही परिक्रमा शिर्डी गावाच्या शिवेवरून जाणार आहे. यासाठी सुमारे 14 किमीचा हा पायी प्रवास असणार आहे. सकाळी 11 वाजेच्या सुमारास खंडोबा मंदिरात परिक्रमेची सांगता होणार आहे. श्री साईबाबा संस्थान, शिर्डी ग्रामस्थ आणि ग्रीन एन क्लीन शिर्डी फौंडेशन यांच्या सहकार्यातून ही शिर्डी परिक्रमा होत आहे. या परिक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग नोंदवून ही परिक्रमा यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या