शिर्डी|प्रतिनिधी|Shirdi
करोना महामारीमुळं जिल्हा प्रशासानाच्या आदेशानं गेल्या साडेतीन महिन्यापासून शहरातील अनेक आस्थापना बंद करण्यात आल्या होत्या. मात्र शिर्डीतील नागरिकांनी भाजपाला खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी करु नये म्हणून भाजीपाला मार्केटची जागा निश्चित करुन सर्व दुकाने एकाच ठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता एकाच ठिकाणी सर्व भाजपाला मिळणार आहे. शिर्डी नगरपंचायतीने हा अनोखा उपक्रम राबविला आहे.
पिंपळवाडी रोडलगत कायम स्वरुपाची भाजीमंडईची उभारणी करण्यात आलेली आहे. नगरपंचायतने परवानगी दिलेल्या भाजी विक्रेत्यांना परवाना देत दुकाने दिली आहेत. मात्र गेल्या साडेतीन महिन्यापासून देशावर करोनाचं संकट आल्यान या ठिकाणची भाजी मंडई बंद करण्यात आली.
येथील भाजी विक्रेत्यांना शहरातील उपनगरांमधील जागा विभागून देण्यात आल्यान त्यांनी त्या ठिकाणी आपली दुकाने थाटली. घराजवळच भाजीचे दुकान आल्यानं नागरिकांची सोय झाली आणि बाहेर पडणं कमी झालं होतं.