Thursday, July 23, 2026
HomeनगरShirdi Crime News : शिर्डीतील युवतीवर धर्मांतरासाठी दबाव; महिलेसह तीन व्यक्तींविरोधात 'पोक्सो'चा...

Shirdi Crime News : शिर्डीतील युवतीवर धर्मांतरासाठी दबाव; महिलेसह तीन व्यक्तींविरोधात ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल

शिर्डी (प्रतिनिधी)

तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे व लग्न केल्यानंतर तुला आमचा इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल तसेच लग्नानंतर रमजान महिन्याचे उपवास धरावे लागतील, असे म्हणत इन्स्टाग्रामवर मेसेज करून तरुणीला घराच्या पाठीमागे बोलावून तिला मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबद्दल राहाता तालुक्यातील निघोज येथील तीन व्यक्तींविरोधात शिर्डी पोलिसात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शिर्डी पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले की, आरोपी इरफान सलीम पठाण याने इंस्टाग्रामवर मेसेज केला की, तू मला आवडतेस, मला तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे असे म्हणून त्याने मला भेटल्यानंतर तू माझ्याशी लग्न केले तर तुला आमचा इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल तसेच तुला लग्नानंतर रमजान महिन्यात येणारे उपास धरावे लागतील, असे म्हटल्यानंतर मी इरफान पठाण याने मला प्रपोज केले असून लग्न करण्याबद्दल बोलत आहे असे आयशा अरबाज पठाण हिला सांगितली.

सदरची बाब ही अयशा पठाण हिने इरफान पठाण व अरबाज सलीम पठाण यांना सांगितली. त्यानंतर आयशा पठाण व अरबाज पठाण हे फिर्यादीला वारंवार तू इरफान पठाण बरोबर लग्न कर असा आग्रह करत लग्न केल्यानंतर तू आमच्या धर्मात ये, आम्ही तुला इस्लाम धर्मात नमाज कसे करतात हे शिकवू असे बोलत होते.

इरफान पठाण याने फिर्यादीला इंस्टाग्रामवर मेसेज करून फिर्यादीच्या घराच्या पाठीमागे बोलावून मिठी मारली व मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे बोलून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबद्दल शिर्डी पोलिसात तीन व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४, ७८ (२) पोक्सो ८, १२, १७ कायदा अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सागर काळे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...