Friday, April 25, 2025
HomeनगरShirdi News : शिर्डीत कोम्बिंग ऑपरेशन; तीन आरोपींना अटक, एक गावठी कट्टयासह...

Shirdi News : शिर्डीत कोम्बिंग ऑपरेशन; तीन आरोपींना अटक, एक गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुसे जप्त

शिर्डी (प्रतिनिधी)

शिर्डी शहरात अवैध व्यवसाय व गुन्हेगारी याचा बिमोड करण्यासाठी शिर्डी पोलिसांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला डीवायएसपी शिरीष वमने व अप्पर पोलीस वैभव कलबुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी विविध कारवाया करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याच माध्यमातून २७ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डी शहरात कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. त्यात महेश गोरख बोराडे राहणार श्रीरामनगर शिर्डी यांच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे व दोन लाख रुपये किमतीची एक बुलेट असा २ लाख १६ हजारांचा मुद्देमाल व तीन आरोपींना अटक करण्यात आली.

- Advertisement -

या कारवाई दरम्यान हद्दपार असलेला सुदाम साहेबराव काळे राहणार कालिकानगर हा मिळून आल्याने त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आली. घरफोडी गुन्ह्यातील आरोपी दुर्गेश नंदलाल कोंडीले (रा.श्रीरामनगर, शिर्डी), संतोष उर्फ गणेश शंकर शिंदे (राहणार बाजारतळ शिर्डी) यांना घरफोडी गुन्ह्यात अटक करण्यात आली त्याबरोबरच मुंबई पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे चार गुन्हे दाखल करण्यात आले तर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे तीन गुन्हे तर महाराष्ट्र जुगार अधिनियम १२ (ब) प्रमाणे एक व ड्रंक अँड ड्राईव्ह पाच केसेस दाखल करण्यात आल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली.

अशाच प्रकारे यापुढेही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाया सुरू राहणार असून अवैध व्यवसाय व गुन्हेगारीत सहभागी असलेल्या संशयित इसमाच्या बाबतीत कोणाला काही माहिती असेल तर ती देण्यासाठी नागरिकांनी निःसंकोचपणे पुढे यावे त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आवाहन शिर्डी पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये सपोनी रामेश्वर कायदे, कचर, जाधव पोलीस कर्मचारी विजय पवार, संतोष गोमसाळे, सुधाकर काळोखे, संतोष लांडे, इरफान शेख, अशोक नशेख, अशोक शिंदे, किरण माळी, विजय खुळे, सतपाल शिंदे, केवल राजपूत, राजेंद्र बिरदवडे यांनी भाग घेतला. या कारवाई नंतरशिर्डी शहरात अनेक गुन्हेगारांनी मोठा धसका घेतला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...