Saturday, June 13, 2026
HomeनगरShirdi : ‘शिर्डीच्या राजकारणात शाळा सुटली, पाटी फुटली’ फ्लेक्समुळे खळबळ

Shirdi : ‘शिर्डीच्या राजकारणात शाळा सुटली, पाटी फुटली’ फ्लेक्समुळे खळबळ

माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांचा डॉ. सुजय विखे पाटील यांना सूचक संदेश

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला वर्गासाठी जाहीर झाल्यानंतर, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी लावलेल्या एका फ्लेक्स बोर्डने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या फ्लेक्सवर लिहिलेला मजकूर थेट डॉ. सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाशी जोडला जात आहे, ज्यामुळे अनेक राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत.

- Advertisement -

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वी डॉ. सुजय विखे पाटील यांनी असे भाष्य केले होते की, जर हे पद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले, तर ते लोणी ते शिर्डी पायी पदयात्रा काढतील. सोमवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर, डॉ. विखे यांचे हे विधान खरे ठरले. याच गोष्टीचा संदर्भ देत कैलासबापू कोते यांनी फ्लेक्सवर, शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला दादांनी मारलं, आई दादांचं वाक्य खरं ठरलं असा सूचक मजकूर लिहिला.

या आरक्षणामुळे अनेक वर्षांपासून नगराध्यक्षपदाची तयारी करत असलेल्या कैलासबापू कोते, अभय शेळके, शिवाजी गोंदकर, कमलाकर कोते यांच्यासह अनेक दिग्गजांचा हिरमोड झाला आहे. या फ्लेक्स बोर्डवर डॉ. सुजय विखे पाटील यांना उद्देशून दादा तुमच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा असेही लिहिले आहे. या शुभेच्छा आणि शेवटी असलेला जय हिंद जय महाराष्ट्र हा उल्लेख राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. यातून कोते यांनी केवळ आपली नाराजीच व्यक्त केली नाही, तर भविष्यातील राजकीय वाटचालीसंदर्भात एक सूचक संदेशही दिला असल्याची चर्चा आहे.

या फ्लेक्समुळे शहरातील राजकीय नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेकांनी ज्यांना हे कळाले त्यांनी ते समजून घ्यावे अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच, कैलासबापू कोते यांच्या या कृतीमुळे शिर्डीच्या आगामी राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १३ जून २०२६ – खांद्यावरील जू उतरले, पण व्यवस्थेचे...

0
लातूर जिल्ह्यातील शेतकरी काशिनाथ गायकवाड व त्यांच्या अर्धांगिनी हौसाबाई यांचे जे चित्र समाज माध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये झळकले, ते आधुनिक, प्रगत आणि डिजिटल भारताचा दावा...