Friday, April 25, 2025
HomeनगरShirdi : साईबाबांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी शिर्डीत चिंतन बैठक

Shirdi : साईबाबांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी शिर्डीत चिंतन बैठक

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

देशभरातील प्रमुख 21 देवस्थानांमध्ये भाविकांची गर्दी वाढत असली तरी, शिर्डीतील गर्दीत अपेक्षित वाढ होत नसल्याने अर्थकारणाला अपेक्षित गती मिळत नसल्याबद्दल शिर्डीचे भूमिपुत्र सुरेश चव्हाणके यांनी खंत व्यक्त केली आहे. साईबाबांविषयी सुरू असलेल्या अपप्रचाराला सकारात्मक पद्धतीने उत्तर देण्यासाठी आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे प्रभाव मार्केटिंग करण्यासाठी सुरेश चव्हाणके यांच्या उपस्थितीत शिर्डीत सामाजिक कार्यकर्त्यांची चिंतन बैठक झाली.

- Advertisement -

या बैठकीत दादासाहेब गोंदकर, प्रमोद गायके, अशोक गोंदकर, निलेश गंगवाल, सुनील सोनवणे, मधुकर कोते, अप्पासाहेब कोते आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुरेश चव्हाणके म्हणाले, साईबाबा मुसलमान आहेत, हे भासवण्याचे छुपे प्रयत्न सुरू आहेत. याचा परिणाम शिर्डीतील गर्दी आणि अर्थव्यवस्थेवर झाला आहे. शिर्डी पर्यटनस्थळ म्हणून नव्हे, तर तीर्थस्थान म्हणून विकसित व्हायला हवे. येथे भक्ती संबंधित विकासकामे व्हायला हवीत.आगामी कुंभमेळ्यासाठी सर्वांना सोबत घेऊन नियोजन करण्याची आवश्यकता चव्हाणके यांनी व्यक्त केली. पुढील 23 दिवसांत या संदर्भात प्राथमिक आराखडा तयार करणार असून साई संस्थान, नगरपरिषद, प्रशासन, ग्रामस्थ, राज्य आणि केंद्र सरकार, साईभक्त, देशभरातील साई मंदिरे अशा विविध स्तरांवर काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी स्वतंत्र कार्यालय, वेबसाईट, घोषवाक्य, वॉररूम आणि डिजिटल कॅम्पेनिंग करण्याचे व यासाठी आपल्या ट्रस्टतर्फे 21 लाख रुपये देण्याचे चव्हाणके यांनी जाहीर केले.

बैठकीत सतीश गंगवाल, नितीन नवलपुरे, ज्ञानदेव गोंदकर, प्रमोद गोंदकर, विनोद नालकर, सुरेश आगे, सुनील गोंदकर, अतुल गोंदकर, प्रतीक शेळके, वैभव कोते, दत्तात्रय गोंदकर, परिमल वेद आदींनीही आपले विचार मांडले. भाविकांशी संवाद वाढवणे, दळणवळण सुधारणे, उज्जैन-वाराणसीसारखा कॉरिडॉर विकसित करणे, गेल्या कुंभमेळ्यातील वाहनतळाचे नियोजनातील चुका सुधारणे, ग्रामस्थांमध्ये एकमत घडवणे, लोकप्रतिनिधी व सर्वांना बरोबर घेणे, गर्दी वाढल्यावर रस्ते बंद न करणे, साईबाबांची बदनामी थांबवणे, नकारात्मक प्रचाराला उत्तर देणे, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणे, नगर-मनमाड रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, भाविकांची लूट थांबवणे, संस्थान आणि ग्रामस्थांचा एकत्रित सोशल प्लॅटफॉर्म तयार करणे, अखिल भारतीय संत मेळाव्याचे आयोजन करणे, आदी सूचना कार्यकर्त्यांनी केल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...