Friday, September 11, 2026
Homeनगरपुणे येथील साईभक्त चोपेकर यांच्याकडून साई चरणी साडेबारा लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण!

पुणे येथील साईभक्त चोपेकर यांच्याकडून साई चरणी साडेबारा लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण!

शिर्डी (प्रतिनिधी)

पुणे येथील साई भक्त विकास चोपकर यांच्याकडून साई चरणी साडेबारा लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला. श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. भाविक भक्तिभावाने साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात.

- Advertisement -

याच भावनेतून गुरुवारी पुणे येथील साईभक्त विकास ताराचंद चोपकर यांनी साईबाबांच्या चरणी ९० ग्रॅम ९७० मिली ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या सुवर्ण मुकुटाची देणगी मुल्‍य सुमारे १२ लाख ८२ हजार ४९५ रुपये असून ही देणगी भाविकांच्या श्रद्धा व भक्तीचे हे एक अनमोल प्रतीक आहे. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दानशूर साईभक्त विकास ताराचंद चोपकर यांचा सत्कार केला.

ताज्या बातम्या

कोल्हार भगवतीपूर येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रवासी बालंबाल बचावले

0
कोल्हार ( वार्ताहर ) कोल्हार भगवतीपूर येथील काळामळा शिवारात दुधाचा टँकर आणि व्हॅगनआर कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन वाहने एकमेकांवर आदळून विचित्र...