Saturday, May 4, 2024
Homeनगर'साई'नामाच्या गजरात शिर्डीत पार पडली परिक्रमा

‘साई’नामाच्या गजरात शिर्डीत पार पडली परिक्रमा

शिर्डी | शहर प्रतिनिधी

सन १९११ -१२ दरम्यान शिर्डी (Shirdi) शहरात प्लेग महामारीची (Plague epidemic) साथ रोखण्यासाठी श्री साईबाबांनी (Saibaba) स्वतः शिर्डी गांवच्या सिमेवर पिठाची सिमारेषा आखली होती.

- Advertisement -

आज तब्बल १११ वर्षानंतर याच सिमेवरून १३ किमी अंतराची शिर्डी परीक्रमा (Shirdi Parikrama) मोठ्या भक्तीभाव वातावरणात काढण्यात आली असून या परिक्रेत देशविदेशातील जवळपास दहा हजार साईभक्तांनी (Sai devotees) सहभाग नोंदवला असून याची देह याची डोळा असे नयनरम्य दृष्य बघावयास मिळाले.

शिर्डी शहरात श्री साईबाबा संस्थान (Shri saibaba sansthan) व ग्रिन एन क्लिन शिर्डी (Green N Clean Shirdi) ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी व रविवार दि.१३ मार्च रोजी सकाळी श्री क्षेत्र खंडोबा मंदीर (Khandoba temple shirdi) येथून सहा वाजता काढण्यात आलेल्या शिर्डी परिक्रमा उत्सवास मोठ्या भक्तीभावाने प्रारंभ झाला. याप्रसंगी साई परिक्रमा रथाचे विधीवत पूजा सराला बेटाचे (Sarala bet) महंत रामगिरी महाराज (Ramgiri maharaj) व प.पू.काशिकानंदगिरी महाराज (Kashikanandagiri Maharaj) यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

यावेळी साईसंस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे (Ashutosh kale), जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील (Shalunitai vikhe patil), खासदार सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande), साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (CEO Bhagyashree Banayat), नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर (Shivaji Gondkar), जेष्ठ नेते कैलासबापू कोते (Kailasbapu kote), मा.नगराध्यक्षा अर्चनाताई कोते (Archanatai kote), विश्वस्त महेंद्र शेळके (Mahendra Shelke), सुरेश वाबळे (Suresh Wabale), सचिन गुजर (Sachin Gujar), अविनाश दंडवते (Avinash Dandwate), संजीवनी उद्योग समुहाच्या संचालीका मनाली कोल्हे (Manali Kolhe) आदीसह शिर्डी शहरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.यावेळी शिर्डी युवा ग्रामस्थ, द्वारकामाई मित्र मंडळ, सन्मित्र मंडळ, छत्रपती शासन,क्रांती युवक मंडळ,शिवनेरी मित्र मंडळ, यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक असे सुमारे दहा हजारांहून जास्त भाविक उपस्थित होते.

ग्रिन एन क्लिन शिर्डी आयोजित शिर्डी परिक्रमेचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून या परिक्रमेत देशविदेशातील हजारो साईभक्तांनी सहभाग घेतला होता. या मिरवणुकीत मुख्य आकर्षण ठरले ते इंदोर येथील पथक तसेच शहरातील साईनिर्माण इंग्लिश मिडीयम, संजीवनी इंग्लिश मिडीयम, गुरुकुल, द्रोणा अँकेडेमीचे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या साईबाबांच्या चित्ररथाचे, यामध्ये डिजे, संबळ वाद्य, भजनी मंडळ यांंचा समावेश होता. १३ किमीच्या या परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी चहापाण्याची तसेच नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

तसेच सदरील परिक्रमा मार्गावर सडा रांगोळ्या काढून परिक्रमावासी यांचे जोरदार स्वागत केले जात होते. या मार्गावर जागरूक देवस्थान श्री बिरोबा देवस्थान आहे. येथेही भाविकांची अपार श्रद्धा आहे. परिक्रमेत भाविकांना अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. नगर मनमाड महामार्गावर (Nagar Manmad highway) मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी जड वाहतूक बाह्य मार्गाने वळविण्यात आली होती.

साधारणपणे पाच हजार महिला भगिनींनी फेटे बांधून आपला सहभाग दर्शवला होता. साईनामाचा गजर तसेच घोषणा देत भक्तिभावाने हि परिक्रमा पुर्ण करून शेवट पून्हा साईभक्त म्हाळसापती श्री खंडोबा मंदीरासमोर केला.१३ किमीच्या या परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी चहापाण्याची तसेच नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.मिरवणुकीत नाश्ता व पाणी बाँटलचा झालेला कचरा गोळा करण्यासाठी ग्रिन एन क्लिन शिर्डीचे सदस्यांनी योगदान दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या