Tuesday, May 21, 2024
Homeनगरसाईंच्या दानपेटीत 71 दिवसांत 32 कोटी

साईंच्या दानपेटीत 71 दिवसांत 32 कोटी

अहमदनगर (प्रतिनिधी) –

शिर्डीचे श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी 16 नोव्हेंबरपासून खुले करण्यात आले. तेव्हापासून म्हणजेच 71 दिवसांत सुमारे

- Advertisement -

12 लाख 2 हजार 162 साईभक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला. या काळात साईभक्तांकडून तब्बल 32 कोटी 2 हजार 191 रुपये देणगी रोख स्वरूपात संस्थानला प्राप्त झालेली आहे. याशिवाय 796 ग्रॅम सोने व 12 हजार 192 ग्रॅम चांदी संस्थानला देणगी स्वरुपात प्राप्त झाली. संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील वर्षी मार्च महिन्यात राज्यातील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. राज्य सरकारने ही धार्मिक स्थळे उघडण्यास 16 नोव्हेंबरला परवानगी दिली. तेव्हापासून शिर्डीच्या साई मंदिरात म्हणजेच गेल्या 71 दिवसात 12 लाख 2 हजार 162 भाविकांनी दर्शन घेतले आहे. तर 10 लाख 45 हजार भाविकांनी साई प्रसादालयात भोजनाचा लाभ घेतला आहे. या काळात साई संस्थानला रोख स्वरूपात 32 कोटी 2 हजार 191 रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. याशिवाय 796 ग्रॅम सोने व 12 हजार 192 ग्रॅम चांदी संस्थानला साईचरणी भाविकांनी अर्पण केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

साई संस्थानच्या वतीने चालवण्यात येणार्‍या भक्तनिवास सुविधेचा गेल्या 71 दिवसांच्या कालावधीमध्ये जवळपास 3 लाख 20 हजार 639 लाभ घेतला आहे. याशिवाय साई संस्थानच्या वतीने मंदिरात दर्शनासाठी येणार्‍यांना उदी देण्यात येते. ही उदी तब्बल 10 लाख 31 हजार साईभक्तांना मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या