Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रशिर्डी संस्थानने पोषाखासंदर्भात लावलेला फलक काढून टाकावा - तृप्ती देसाई

शिर्डी संस्थानने पोषाखासंदर्भात लावलेला फलक काढून टाकावा – तृप्ती देसाई

पुणे (प्रतिनिधी) –

शिर्डी परिसरात येण्यास बंदीची नोटीस एकतर्फी असून काहीही झाले तरी 10 डिसेंबरला शिर्डीत जाणारच असे सांगत शिर्डी संस्थानने

- Advertisement -

पोषाखासंदर्भात लावलेला फलक काढून टाकावा अन्यथा दहा डिसेंबरला स्वतःहुन हा बोर्ड काढू असा इशारा देणाऱ्या भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

शिर्डी परिसरात येण्यास मज्जाव करणारी नोटीस बजावण्यात आली आहे. तृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर पर्यत बंदी करण्यात आली असून शिर्डीचे विभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी याबाबत आदेश काढले आहेत, शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना त्यांच्या घरी जाऊन या आदेशाची नोटीस दिली आहे.

.मात्र ही नोटीस एकतर्फी असल्याचं तृप्ती देसाई यांचं म्हणणं आहे शिर्डी संस्था ने लावलेला फलक अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधातला आहे संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून आम्हाला नोटीस दिली जाते संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला दिला आहे. त्यामुळे आम्ही शिर्डीत जाणारच असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

शिर्डी संस्थान शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मंदिराच्या आवारात पोषाखा संदर्भात फलक लावले आहेत भाविकांनी मंदिर परिसरात सभ्य पोशाख घालावा अशा स्वरूपाचं आवाहन संस्थानच्यावतीने फलक लावून करण्यात आले आहे याच फलकांना तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला असून भाविकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही पायमल्ली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे संस्थाने हे बोर्ड आठ दिवसात काढून टाकावे अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला होता मात्र संस्थांनी हे बोर्ड स्वतःहून न काढल्यास 10 डिसेंबरला शिर्डीत जाऊन स्वतः फलक हटवणार असल्याचे यापूर्वीच तृप्ती देसाई यांनी जाहीर केले होते त्यानुसार त्यांना आठ डिसेंबर ते अकरा डिसेंबर दरम्यान शिर्डी परिसरात येण्यास मज्जाव घालणारी नोटीस धाडण्यात आली आहे..

- Advertisment -

ताज्या बातम्या