Monday, May 20, 2024
Homeनगरविरोधकांना आम्ही तिघे संताजी-धनाजीसारखे दिसतो

विरोधकांना आम्ही तिघे संताजी-धनाजीसारखे दिसतो

शिर्डी | Shirdi

शेतकर्‍याच्या मुलाला आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या सच्च्या कार्यकर्त्याला किती पाण्यात बघाल? तुम्हाला उठता-झोपता फक्त एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमचे दोन उपमुख्यमंत्री दिसतात. इतिहासात संताजी-धनाजी दिसायचे, तसे. पण कितीही केलं, तरी एक लक्षात ठेवा. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी शिर्डी (Shirdi) येथील शासन आपल्या दारी (Shasan Aaplya Dari) कार्यक्रमात केला.

- Advertisement -

शिर्डीजवळील काकडी विमानतळाजवळ ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम (Shasan Aaplya Dari Programme) दणक्यात झाला. या कार्यक्रमास उपस्थित मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि अजितदादा पवार (DCM Ajit Pawar) यांनी जोरदार टोलेबाजी करीत विरोधकांवर शाब्दिक हल्ला केला.

रोज सकाळी उठल्यावर साईबाबांकडे आपण प्रार्थना करतो की जनतेला सेवा मिळायला हवी. त्यासाठी आम्हाला बळ द्या. पण विरोधक रोज उठल्यावर प्रार्थना करतात एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाऊ द्या. आधी म्हणाले सरकार पडेल. पण तसं म्हणता म्हणता त्यांचे ज्योतिषी संपले व अजित पवारही इकडे आले. आता सरकार मजबूत झालंय.

जनतेचा आशीर्वाद सरकारच्या पाठिशी असेपर्यंत सरकारचं केसही वाकडं होऊ शकत नाही. विरोधकांनी कितीही स्वप्नं पाहिली तरी फरक पडणार नाही. स्वप्नं दिवसा पाहू द्या, रात्री पाहू द्या, कधीही पाहू द्या, काहीही फरक पडणार नाही, असा दावा करीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, निळवंड्याचे पाणी आम्हीच दिले आहे. 35 सिंचन प्रकल्पांना (Irrigation Projects) मान्यता दिली आहे. 12 कोटी जनतेला मोफत आरोग्य सेवा दिली आहे.

महामानवांबद्दल बेताल बोलू नका

या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महामानवांबद्दल कुठलंही बेताल वक्तव्य करता कामा नये, असा इशारा देत मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच महामानवांबद्दलच्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरेंवर टीका

काहींना वाटतंय आपले बारा वाजतील, पण आमचं सरकार लोकांपर्यंत जाणारं सरकार आहे. बंद दाराआड बसणारं सरकार नाही. हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे, फेसबुकवर बोलणारं सरकार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली.

जिल्हा कायम आघाडीवर – पालकमंत्री विखे पाटील

कार्यक्रमाचे मुख्य संयोजक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. मु्ख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात आधीच सरकार वेगात काम करत होतं, आता अजितदादांच्या येण्यानं ट्रिपल इंजिन सरकार जास्त वेगात काम करत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांत नगर जिल्हा कायमच आघाडीवर राहिला आहे, असा दावाही त्यांनी केला. या वेळी त्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रशासनाने चांगले काम केल्याचे गौरवोद्गार काढले.

- Advertisment -

ताज्या बातम्या