शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डीतील शहाणे हाउसिंग सोसायटी आणि पिंपळवाडी (Pimpalwadi) परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरीच्या (Theft) दोन घटना घडल्या. रूई (Rui) शिवारात चोरट्यांनी शेतकर्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले तर हाउसिंग सोसायटीतील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटमध्ये ठेवलेले अडीच तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) तसेच 25 हजार रोख रकमेची चोरी केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिर्डीतील (Shirdi) शहाणे हाउसिंग सोसायटीमध्ये राहणारे साई संस्थानचे कर्मचारी राहुल ओहोळ देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या पत्नीही रात्री ड्युटीवर असल्याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरातून अडीच तोळे सोने आणि 25 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.
याप्रकरणी ओहोळ यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) तक्रार नोंदवली आहे तर शनिवारी रात्रीच पिंपळवाडी येथील सिद्धेश्वर हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली आहे. या घटनेची तक्रार ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली आहे. या दोन ठिकाणी शनिवारी रात्री झालेल्या चोरी (Theft) घटने बरोबरच शिर्डी जवळील रुई शिवारात दुचाकीवरून घरी जाणार्या शेतकर्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. छबूराव बाबूराव भडांगे शेतातील पाणी पंप सुरू करून घरी जात असताना, झुडपात दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांच्यावर अचानक हल्ला (Attack) केला. हल्लेखोरांनी त्यांना पोत्यात टाकण्याचा प्रयत्न करत जबर मारहाण (Beating) केली. या हल्ल्यात भडांगे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायावर आणि हातावर तीव्र मार लागला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्याकडील रोकड न घेता फक्त मोबाईल आणि दुचाकीची चावी घेऊन पसार झाले, त्यामुळे हा घातपात करण्याचा प्रयत्न असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) ओहोळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, मंदिरातील चोरी आणि शेतकर्यावरील हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
तसेच हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेले भडांगे यांच्यावर साईनाथ हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. शिर्डीतील घरफोडी प्रकारानंतर नगर (Ahilyanagar) येथून श्वान पथकाला (Dog Squad) बोलवण्यात आले होते चोरी झालेल्या ठिकाणी श्वानाने जाऊन वास घेत बाहेर काही अंतरापर्यंत मागं दाखविला चोरटे तिथून वाहनाने प्रसार झाले असावे असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला. चोरी झालेल्या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने व पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली आहे. या ठिकाणी रात्री पोलिसांनी अधिक जास्त गस्त वाढावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली असून या हाऊसिंग सोसायटीमध्ये याआधी देखील चोरी (Theft) झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.