Saturday, July 27, 2024
Homeनगरशिर्डीत भाजी मार्केटचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे - निलेश कोते

शिर्डीत भाजी मार्केटचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे – निलेश कोते

शिर्डी|शहर प्रतिनिधी|Shirdi

राज्यात बहुतांश ठिकाणी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव भाजी मार्केट येथून पसरण्याचे निदर्शनास आले आहे. शिर्डी नगरपंचायतीने लॉकडाऊन पूर्वी शहरातील भाजी मार्केटचे विकेंद्रीकरण करत प्रत्येक उपनगरात सोशल डिस्टस्निगंचे नियमानुसार भाजी विक्रेत्यांना भाजी विक्री करण्याची परवानगी दिली होती,

- Advertisement -

मात्र शिर्डी नगरपंचायतीने आता पुन्हा एकाच जागेवर भाजी मार्केट सुरू करायला परवानगी दिल्याने शहरातील नागरिक करोनाच्या भीतीने धास्तावले असून भाजी मार्केटचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे मत शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी व्यक्त केले.

राज्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आला असला तरी देखील करोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शिर्डी शहरात नगरपंचायतीच्यावतीने लॉकडाऊन घोषित होताच मध्यवर्ती भागात असलेल्या भाजी मार्केटचे विकेंद्रीकरण केले होते. त्यामुळे शहरात करोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी मोठी मदत मिळाली होती.

काही प्रमाणात लॉकडाऊन शिथील झाला असला तरी देखील करोना झपाट्याने वाढत आहे. अशावेळी नगरपंचायतीने एका ठिकाणी भाजी मार्केट भरविण्याचे आदेश दिले असल्याने शहरातील नागरिकांना भाजी घेण्यासाठी एकाच ठिकाणी यावे लागत आहे. त्यामुळे याठिकाणी भाजी विक्रेत्यांकडून तसेच घेणार्‍याकडून मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकाच ठिकाणी गर्दी होणार असल्याने करोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शहरातील उपनगरात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार भाजीपाला विक्री सुरू ठेवावी. जेणेकरून शेतकर्‍यालाही दोन पैसे जादा मिळतील आणि करोना रोखण्यात नगरपंचायत प्रशासन यशस्वी होईल, असे मत माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या