Monday, March 31, 2025
Homeनगरशिर्डीच्या बिरोबा बनातील विहिरीत बिबट्या अडकला

शिर्डीच्या बिरोबा बनातील विहिरीत बिबट्या अडकला

दीड तासाच्या प्रयत्नानंतर सुटका; बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डीतील बिरोबा बनात संजय कोते यांच्या घराशेजारील स्वतःच्या विहिरीत गुरुवारी मध्यरात्री बिबट्या पडल्याने पुन्हा एकदा परिसरात भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश मिळाले.

- Advertisement -

बिबट्यांनी आपला मोर्चा बिरोबा बनात वळविल्याने येथील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. बन परिसरात असलेल्या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

शिर्डी जवळील बिरेगाव बन भागात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास संजय माधव कोते यांच्या विहिरीत हा बिबट्या आढळून आला. यावेळी संजय कोते यांनी सांगितले की, पहाटेच्या वेळी मोठा आवाज झाल्याचे ऐकू आले होते मात्र आम्ही या आवाजाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सकाळी शेतीपंप चालू करायला गेलो असता विहिरीतून डरकाळीचा आवाज ऐकल्यानंतर कोते यांनी विहीरीत पाहिले तर त्यांना बिबट्या नजरेस पडला. साधारण दीड वर्ष वयाचा हा बिबट्या असावा. रात्री शिकारीच्या शोधात तो या ठिकाणी फिरत असतांना आमच्या 70 फूट विहिरीत पडला, असा अंदाज शेतकर्‍यांनी वर्तविला. त्यांनी तातडीने वनविभागास माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले.

मात्र ते रिकाम्या हाताने आल्याने पिंजर्‍यासाठी सात ते आठ तास प्रतिक्षा करावी लागली. त्यानंतर पिंजरा आणण्यात आला. दरम्यान या बिबट्याला पिंजर्‍यात अडकवल्यानंतर वर काढण्यासाठी दीड तास लागला.

बिरोबा बनात आतापर्यंत चार ते पाच बिबटे नजरेस पडल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. पहाटेच्या वेळी पडलेल्या बिबट्याला अन्न न मिळाल्याने थकल्या सारखा दिसून येत होता. सदर बिबट्या जिवाच्या आकांताने डरकाळी फोडत होता. त्याला पाहण्यासाठी यावेळी मोठी गर्दी झाली होती. विहीतील एका फळीवर त्याने आश्रय घेतला होता.

बाहेर पडण्यासाठी एकटक डोळे वर करून बघत होता. जर वेळेत बिबट्याला बाहेर काढले नसते तर वन्यजीव शेड्यूल कास्ट वन कायद्यानुसार सगळेच जण अडचणीत सापडले असते. तरी या परिसरात संचार करीत असलेल्या बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : शासकीय बांधकाम ठेकेदाराचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींवर...

0
पुणे | प्रतिनिधी | Pune शासकीय बांधकाम ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी निर्घुण खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता .या...