मुंबई | Mumbai
संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून ओळख असलेले शिरीष महाराज मोरे (३०) यांनी आत्महत्या केली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी त्यांची जीवनयात्रा संपली आहे. त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून पाऊल उचलल्याचे कारण आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलेय. शिरीष महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. होणाऱ्या बायकोला देखील शिरीष महाजारांनी चिठ्ठी लिहिली होती.
शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या निधनामुळे तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई- वडील असा परिवार आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीत टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण लिहिले आहे. तसेच होणाऱ्या पत्नीला माझ्या साठी तू कुठे थांबू नकोस, तुझे आयुष्य जग, असे देखील म्हणाले आहे.
शिरीष महाराज मोरेंनी अचानक टोकाचे पाऊल का उचलले? या चर्चांना दिवसभर उधाण आले होते. महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार चिठ्ठ्यांमध्ये दडलेय. पहिल्या चिठ्ठीतून आई, वडील आणि बहिणीला, दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला अन चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश दिलाय. या चिठ्ठ्यांमधून आत्महत्येमागचे कारण ही समोर आलेय. डोक्यावर असलेल्या कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. शिरीष महाराज गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न त्यांना भेडसावत होता आणि याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हंटले जात आहे.
चिठ्ठीमध्ये नेमकं काय आहे?
“माझी लाडकी पिनू, प्रियांका…खरं तर तुझा आता कुठे हात पकडला होता. आपले आयुष्य आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. माफ कर. आयुष्यात सर्वांत जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही,” असे शिरीष महाराजांनी आपल्या चिठ्ठीत म्हंटले आहे.
यासह, “माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्ने तोडून जातोय,” असेही शिरीष महाराजांनी म्हटलेय.
“कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळेच राहिले. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलेस तू. तू खूप गोड आहेस. निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल. जप स्वत:ला. एवढा काळ थांबलीस. आता मीच नसेल त्यामुळे थांबू नको. पुढे जा. खूप मोठी हो. आणि हो खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम हो. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या. मला माफ कर… तुझाच अहो.. शिरीष” असेही शिरीष महाराजांनी चिठ्ठीत म्हटलेय.
शिरीष महाराजांचा वीस दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. त्यांचा एप्रिल महिन्यात विवाह होणार होता. ते प्रसिद्ध प्रवचन आणि कीर्तनकार आहेत. तसेच शिवव्याख्याते देखील होते.
माझ्यावर कर्जाचा डोंगर
‘माझ्यावर कर्जाचे डोंगर असून मी कोणाकडून किती कर्ज घेतले, याची कल्पना माझ्या बाबांना आहे. तरी देखील मी त्यांची नावे आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण ३२ लाखांचे कर्ज आहे. त्यापैकी कार विकून ७ लाख फिटतील. २५ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी माझ्या कुटुंबाला साथ द्या, अशी विनंती महाराजांनी मित्रांना केली. ‘मला वाटत होते, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही, म्हणून हे टोकाचे पाऊल उचलत आहे, असे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीची ही महाराजांनी माफी मागितली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा