Saturday, April 26, 2025
Homeधुळेखुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जळगावात अटक

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जळगावात अटक

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शिरपूरातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार न्यायबंदीला ममुराबादमध्ये पकडण्यात आले. धुळे शहर पोलिसांनी जळगाव एलसीबीच्या मदतीने त्याला अटक केली आहे.

- Advertisement -

सुरेश जुमान पावरा (रा. जुना करवंद रोड, कळमसरे ता.शिरपूर) याच्यावर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून तो या गुन्ह्यात धुळे मध्यवर्ती कारागृहा अतंर्गत जिजामाता कन्या हायस्कूल येथे तात्पुरते कारागृहात येथे न्यायालयीन बंदी होता. त्या दरम्यान तो दि.22 जुन रोजी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान खिडकीचे गज तोडून फरार झाला होता. त्याचा शहर पोलिसांकडून कसून शोध सुरू होता.

तो ममुराबाद मार्गे जळगावात येेणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार सपोनि श्रीकांत पाटील यांच्यासह पथकाने जळगाव येथे जावून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने आरोपीला ममुराबाद बसस्थानकाजवळील लाकडाच्या वखार येथून ताब्यात घेतले आहे.

त्यानंतर आरोपीला अटक, करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची कोठडीत रवानगी केली आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक राजू भुजबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि श्रीकांत पाटील, तपास पथकाचे कर्मचारी पोना मुख्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, अविनाश कराड, राहूल गिरी, कमलेश सुर्यवंशी व चालक सचिन पगारे यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या