Saturday, May 4, 2024
Homeधुळेशिरपूर पोलिसांनी तोतया पोलिसांना पकडले

शिरपूर पोलिसांनी तोतया पोलिसांना पकडले

बोराडी । Boradi । वार्ताहर

आपण पोलीस (police) असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी (Threatened to file charges) देत चांदीच्या दागिन्यांसह (silver jewelery) 80 हजाराचा ऐवज लांबविणार्‍यांना पोलीसांनी नाकेबंदी करुन अटक (Arrested by blockade) केली आहे. शिरपूर तालुक्यातील उमर्दा गावातील खारेपाडा येथे ही घटना घडली.

- Advertisement -

खारेपाडा येथील किराणा दुकानदाराच्या घरात घुसून दुकानदाराच्या पत्नीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारेपाडा येथे दादल्या गुजार्‍या पावरा यांचे दोन मजली घर आहे. खालच्या मजल्यात किराणा दुकान आहे व वरच्या मजल्यावर राहते घर आहे. पावरा हे दिनांक 11 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास किराणा दुकान बंद करून वरच्या मजल्यावर झोपण्याच्या तयारी करीत होते. त्या वेळी त्यांची पत्नी लता हिने तिचे अंगावरील चांदीच्या वेल्या काढून ते दागिने पलंगावर उशाला ठेवले होते. तेव्हा घरात अचानक सहा अज्ञात व्यक्ती आले व त्यापैकी एकाने काहीतरी कार्ड दाखवून आम्ही नाशिकचे पोलीस आहोत असे सांगितले.

त्यानंतर कार्ड दाखविणार्‍या व्यक्तीनेे तुम्ही बोगस खत, बियाणे विक्री करत असल्याची माहिती मिळाली असून आम्हाला घराची झडती घ्यावायाची आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी घराची झडती घेतली यात बोगस खत, बी-बियाणे असे काही सापडले नाही.यानंतर कार्ड दाखविणार्‍या व्यक्तीने मी साहेब आहे तुमच्यावर आम्ही पोलीस केस करु नाहीतर तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

त्यानंतर त्यांनी पावरा यांची बळजबरीने शर्टची कॉलर पकडून घरा शेजारी लावलेली एक पांढर्‍या रंगाची चारचाकी वाहनाकडे घेवून गेले. तेव्हा लता हिने त्या व्यक्तींना विनवणी करून पत्नीने त्यांना घरात असलेले चांदीचे दागिने आणुन त्यांना दिले. त्या व्यक्तींपैकी एकाने सदरचे दागिणे ठेवून घेतले. तरी देखील त्यांनी त्यांना सोडले नाही. उलट त्यांनी अजुन पैशांची मागणी करुन गाडीत मागच्या साईडला बसवुन गाडीचा दरवाजा बंद करुन घेतला आणि गाडी सुरू करुन पुढे घेवुन गेला व शांत न बसल्यास मारहाण करण्याची धमकी दिली.

त्यामुळे पत्नी आरडाओरड करुन गाडी सामोर उभी राहिली. तेव्हा शेजारी राहणारा लहान भाऊ बाबुलाल गुजार्‍या पावरा तसेच शेजारी अर्जुन चिमा पावरा, प्रकाश भाईदास पावरा व गावातील लोक जमा होवु लागले. सदर कार्ड दाखविणारा व्यक्ती व गाडीतील ड्रायव्हर हे गाडीत बसलेले होते. व इतर तीन व्यक्ती हे गाडीच्या बाहेर उभे होते.

तेव्हा अर्जुन चिमा पावरा यांनी सदर व्यक्तींपैकी कार्ड दाखविणार्‍या व्यक्तीस विचारले की, तुम्ही पोलीस आहात तर तुमचे ओळखपत्र दाखवा. तेव्हा त्या व्यक्तीने कार्ड दाखविले. तेव्हा ते कार्ड प्रहार प्रेसचे असल्याचे दिसले. तेव्हाच बाबुलाल गुजार्‍या पावरा यांनी गाडीचा मागचा दरवाजा उघडुन त्यांना बाहेर काढले. आणि जमलेल्या लोकांनी त्यांना चौकशी करु लागल्याने गाडीत बसलेले दोन्ही व्यक्ती हे गाडी घेवून पळून गेले व उर्वरीत रस्त्याने पळत सुटले. तेव्हा त्यांचा गावातील लोकांनी पाठलाग केला परंतु सदर व्यक्ती हे अंधाराचा फायदा घेवनु लपल्याने ते मिळुन आले नाही. त्यानंतर सदर बाबत पोलीसांना घटनेची माहिती दिली.

त्यांनतर पोलीस घरी आले त्यांना त्या व्यक्तींचे वर्णन सांगितले. त्यावरुन पोलीसांनी नाकाबंदी करुन पाच जणांना पकडले. सदर घटनेसंदर्भात सकाळी 10 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले. तेव्हा पोलीसांनी पकडलेल्या व्यक्तींना त्यांना ओळखले आहे. विजय रमेश देवरे, साहिल कबीर शेख, राहुल दयाभाई पटेल, गोटीराम गिणा पावरा, मिलींद बन्सीलाल शेजवळ यांच्या विरोधात तक्रार दाखल देण्यात आली आहे.

या घटनेत 80 हजार रुपये किंमतीच्या चांदीचे हातातील 60 भार वजनाच्या 8 (चार जोड) वेल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी चालकासह त्यांच्या विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या