Sunday, May 26, 2024
Homeनाशिकशिरवाड्याचे डाळिंब रशिया, बांग्लादेशला रवाना

शिरवाड्याचे डाळिंब रशिया, बांग्लादेशला रवाना

पिंपळगाव ब.। वार्ताहर Pimpalgaon Basvant

करोना ( Corona ) काळातही शिरवाडे वणी ( Shirvade Vani )येथील पिता-पुत्रांनी द्राक्षांबरोबरच डाळिंब पिकाचे योग्य नियोजन ( Proper planning of pomegranate crop ) करून दर्जेदार उत्पादन घेतले. आपल्या 4 एकर डाळिंब बागेसाठी प्रति एकरी दीड लाख रु. खर्च करुन 4 एकर डाळिंब पिकातून 35 लाखांचे उत्पन्न घेत हे डाळिंब बांगलादेश, रशिया येथे निर्यात करून (By exporting pomegranates to Bangladesh, Russia ) रामराव डेरे व रवी, विशाल डेरे या पिता-पुत्रांनी शेतकर्‍यांपुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. डेरे यांचे डाळिंब पाहण्यासाठी जिल्हाभरातील शेतकरी हजेरी लावत आहे.

- Advertisement -

शिरवाडे वणी येथील रामराव डेरे ( Ramrao Dere )आणि त्यांचे दोन मुले रवी आणि विशाल दोघेही उच्चशिक्षित. नोकरीच्या मागे न लागता दोन्ही भावंडांनी वडिलोपार्जित शेतीचा पर्याय ( farming business )निवडला आणि द्राक्षबागेबरोबरच डाळिंबाची लागवड केली. मात्र अवकाळीने द्राक्षांवर संक्रांत ओढवली. करोनाबरोबरच बेमोसमी पावसाने द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला होता. मात्र डेरे भावंडांनी डाळिंब तज्ञ संजय गुंजाळ यांचा सल्ला घेत त्यासाठी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली.

4 एकरावर डाळिंबाची लागवड करत निम्मी जैविकखते आणि निम्मी रासायनिक खते वापरली. नियोजन करून ड्रीपद्वारे रोपे जगवली. अभ्यासूवृत्तीने फवारण्या करून रोगांचा प्रादूर्भाव रोखला. लाल भडक अन् दर्जेदार फळ तयार करून बांगलादेश आणि रशियाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविले आणि भरगच्च पैसा घेतला. त्यामुळे डेरे म्हणतात की, करोना आणि अवकाळीचा फटका द्राक्ष पिकाला बसल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते.

मात्र योग्य नियोजन करून दर्जेदार डाळिंब तयार केले चांगला भाव मिळाला. त्यामुळे द्राक्षाने मारले मात्र डाळिंबाने तारले असल्याचे डेरे सांगतात. डाळिंब फळ वाढीसाठी ड्रीपमधून लिक्विड खते दिली. त्याचप्रमाणे तेल्या, डांबर या रोगांचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून नीम, करंज, कपूर याची फवारणी केली. सहा महिन्यांत फळ काढणीस आले. त्यासाठी कलर सोडणे, शायनिंग यासाठी पोटॅशियम सोनाईचा ड्रीपमधून वापर केला.

दव आणि उन्हामुळे प्रतवारी कमी होऊ नये आणि डाळिंब चांगल्या प्रकारचे दिसावे म्हणून प्रत्येक झाडावर जुन्या कपड्याचे पांघरून घातले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतमाल पाठवणार्‍या चिफू ग्रोटेक प्रा. लिमिटेड एक्सपोर्ट कंपनीने डेरे यांचे डाळिंब बागेची पाहणी केली. त्यांनी जागेवरच 80 रुपये किलो दराने त्याची खरेदी केली आणि ते दर्जेदार डाळिंब बांगलादेश आणि रशियात पाठवून डेरे पिता-पुत्रांना 4 एकर डाळिंबाचे तीन राऊंड करत 35 लाख रुपयांचे उत्पादन मिळवून दिले. शेतकरी बागेबाबत त्यांचेकडून मार्गदर्शन घेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या