Friday, April 25, 2025
Homeनगरनगरमध्ये शिवजयंती मिरवणुकीत डीजेचा दणदणाट

नगरमध्ये शिवजयंती मिरवणुकीत डीजेचा दणदणाट

भव्य मूर्तींसह अघोरी साधुंनी काढल्या आगीच्या ज्वाळा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त सोमवारी अहिल्यानगर शहरात डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढण्यात आली. यात शिवसेना शिंदे गटासह चार संघटना मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या महिला व मुलींच्या लेझीम पथकाने व बँड पथकाने सर्वांचे लक्ष वेधले. रात्री उशिरा मिरवणूक शांततेत पार पडली. दरम्यान, प्रभू श्रीराम, वीर हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य मूर्ती मिरवणुकीत होत्या.

- Advertisement -

दुपारी बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक सुरू झाली. शिवसेना शिंदे गट, जय तुळजाभवानी युवा मंच, वर्चस्व ग्रुप, माळीवाड्याचा राजा, आमदार शिवाजी कर्डिले प्रतिष्ठान या संघटना मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात शिवालयासमोर आकर्षक सजावट, एलईडी स्क्रीन व डीजे लावण्यात आला होता. मिरवणुकीच्या अग्रभागी महिला व मुलींच्या पथकाने लेझीम नृत्य व प्रात्यक्षिके सादर केली. रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता झाली. दरम्यान, मिरवणूक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, मिरवणूक मार्गावर बॅरिकेट लावून वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. मिरवणुकीदरम्यान अघोरी साधुंचा शिवतांडवचा देखावा सादर करण्यात आला.

या साधूंनी आगीच्या ज्वाळा काढत नगरकरांना मंत्रमुग्ध केले. एमआयडीसी, नवनागापूर येथे युवा सेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून नवनागापूर येथे शिवस्मारक व शिवस्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नवनागापूर येथील ग्रामस्थ युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एमआयडीसीचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर शहरातील स्वास्तिक चौक येथे शिवसेना व जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने चौकात स्टेजवर 20 फुटी भव्य राजवाड्याची प्रतिकृती साकारुन शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा साकारण्यात आला. यावेळी प्रथम महिला महापौर शिलाताई शिंदे, माजी महापौर सुरेखा कदम, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, विद्या खैरे, शोभनाताई चव्हाण, सलोनी शिंदे, तृप्ती साळवे, मनीषा घोलप या महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शहर भाजपाच्यावतीने जुन्या बसस्थानक जवळील अश्वारूढ महाराजांच्या पुतळ्यास शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड अभय आगरकर, सरचिटणीस सचिन पारखी व प्रशांत मुथा आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवा की जय बोलो…संभा की जय बोलोचा जयघोष उपस्थित पदाधिकार्‍यांनी केला. यावेळी राजेंद्र काळे, मनोज ताठे, विलास नंदी, संजय ढोणे, बाळासाहेब भुजबळ, दिपक देहेरेकर, डॉ.दर्शन करमाळकर, वैभव लांडगे, गोपाल वर्मा, अरुण शिंदे, बाळासाहेब गायकवाड, ज्योती दांडगे, मिरा सरोदे, रेखा मैड, सोनाली चितळे, निता फाटक, राखी आहेर, महेश नामदे, राजेंद्र फुलारे, प्रकाश जोशी, अनिल निकम, संतोष गांधी, सुनील तावरे, बाबासाहेब सानप, ड विवेक नाईक, सुनील सकट, गोकुळ काळे, संपत नलावडे, तुषार पोटे, मंगेश खंगले, भार्गव फुलारे, राजू वाडेकर, भानुदास बनकर, दत्ता गाडळकर, राजेंद्र सातपुते, मयूर बोचूघोळ, मिलिंद भालसिग, ऋदरेश अंबाडे, सुहास पाथरकर, अशोकराव गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...