Saturday, September 21, 2024
Homeमुख्य बातम्यावाडकरांच्या घरात जन्माला आली 'शिवसेना'; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

वाडकरांच्या घरात जन्माला आली ‘शिवसेना’; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

मुंबई | Mumbai

- Advertisement -

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ४० आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीला (Guwahati) गेले आणि महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर शिवसेना (Shivsena) दोन गटात विभागली गेली. तर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

तेव्हापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु झाला असून ४० आमदारांना सोबत घेऊन जाणारे एकनाथ शिंदे हे शिवसेना आपलीच असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील शिवसेनेवर आपले वर्चस्व असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता शिवसेना कुणाची हा वाद आता थेट कोर्टापर्यंत पोहचला आहे.

त्यानंतर आता डोंबिवलीत नव्या शिवसेनेचा जन्म झाला असून डोंबिवलीतील (Dombivali) पांडुरंग वाडकरांनी (Pandurang Wadkar) आपल्या मुलीचे नाव “शिवसेना” असे ठेवले आहे. पांडुरंग वाडकर हे डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका परिसरात आपली पत्नी व दोन मुलींसह राहत असून महाड कीये येथील रहिवाशी आहेत.

याबाबत पांडुरंग वाडकर यांनी सांगितले की, गेल्या १७ ऑक्टोबरला मला मुलगी झाली. त्यावेळी रात्री झोपलो असताना अचानक बाळासाहेब माझ्या स्वप्नात आले आणि मी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा बाळासाहेबांकडे शिवसेनेत पडलेल्या फुटीबद्दल खंत बोलून दाखवली. त्या क्षणाला बाळासाहेब बोलले तू घाबरू नकोस शिवसेना तुझ्या घरात आली आहे. तेव्हा लगेचच मला फोन आला व मुलगी झाल्याचे समजले. त्यामुळे मी मुलीचे नाव ‘शिवसेना’ असे ठेवल्याचा वाडकर म्हणाले. तसेच त्यांनी मुलीच्या नावाची नोंद ग्रुप ग्रामपंचायतीत केल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या