Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकमनपावर भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागा - खा. संजय राऊत

मनपावर भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागा – खा. संजय राऊत

नाशिक रोड । प्रतिनिधी

महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले नाशिक रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 17, 21, 22 मधील विविध कामांचा शुभारंभ उद्घाटन सोहळा खासदार राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते

- Advertisement -

1968 झाली देवळाली गाव येथील शिवसेने च्या पहिल्या शाखेचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते या शाखेचे नूतनीकरण व शिवसैनिकांच्या शिलेदार स्तंभा चे अनावरण खासदार राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले ते पुढे म्हणाले की राज्यात पन्नास वर्षाच्या काळात शिवसेनेचे आमदार खासदार निवडून आणले महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका याठिकाणी सत्ता मिळविली शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याइने शिवसेनेने वैभव प्राप्त केले.

याप्रसंगी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी खासदार हेमंत गोडसे उपनेते बबनराव घोलप जिल्हाप्रमुख विजय करंजकर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार योगेश घोलप नगरसेविका सौ सत्यभामा गाडेकर सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे ज्योती खोले केश व पोर जे सुनीता कोठुळे जगदीश पवार प्रशांत दिवे मंगल आढाव दिनकर आढाव सुमन सातभाई आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या