Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना मुसंडी मारण्याच्या तयारीत

शिवसेना मुसंडी मारण्याच्या तयारीत

नाशिक । रवींद्र केडिया Nashik

शिवसेनेच्या दोन गटांत विभागणीनंतर शहरात मोठ्या घडामोडी घडताना दिसू लागल्या आहेत. शिंदे गटाकडून नगरसेवकांना आकृष्ट करण्याची मोहीम सुरू असताना ठाकरे गटाकडून पक्ष अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमधून जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लक्ष वेधण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना; पण सामान्य जनतेच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध होऊ लागले आहे.

- Advertisement -

शिवसेना पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्वात जनसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. नाशिक शहराचा विचार करता मध्यवर्ती कार्यालयामार्फत रुग्णांना उपचारांसाठी कोट्यवधींची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली आहे. याशिवाय आधार कार्ड, शासकीय योजना, विविध दाखले तसेच समस्यांसाठी सोडवण्यासाठी कार्यालयात कक्ष उभारण्यात आला आहे.

लोकांच्या मदतीसाठी शिवसैनिकांना प्रेरित करण्यात आले आहे. जन-सामान्यांपाठोपाठ धार्मिक क्षेत्रात पदार्पण करीत शहरातील विविध भागांतील भजन मंडळींना एकत्रित करून आपला हिंदुत्वाचा झेंडा आणखी उंच नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक नवा घटक संघटनेसोबत जोडण्याचा हेतू त्यातून साध्य होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या उपक्रमापाठोपाठ युवकांना आकर्षित करण्यासाठी रिल्स स्पर्धा ठेवण्यात आली आहे. युवाशक्तीचा विशेष ओढा रिल्स पाहण्यासोबत रिल्स बनवण्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या आवडीचा विषय देऊन त्यांना आपल्याकडे ओढण्याचा हा एक वेगळा प्रयोग आहे. यातून मुलांच्या कल्पकतेला वाव देण्याचाही प्रयत्न दिसून येत आहे. दिलेल्या विषयांवर योग्य पद्धतीने मांडणी करून निर्धारित वेळेत हे रील सादर करण्याची कला यातून दिसून येणार आहे. पक्ष संघटना नागरिकांच्या प्रश्नांसाठी पुढे येणे गरजेचे असते. वैद्यकीय उपचार व त्यासाठी नागरिकांना मदतीचा हात शिवसेनेने पुढे गेला आहे.

संघटनेच्या विविध शाखांची बांधणी करून शहरभरात महिला संघटन युवा संघटन बांधणी करून विविध जाती धर्माच्या समाजाच्या नागरिकांना संघटनेच्या सोबत आणण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. येत्या काळात निवडणुकांमध्ये त्याचे फलित आपल्याला पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या