Saturday, May 4, 2024
Homeनाशिकदिंडोरी : इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचे निदर्शने

दिंडोरी : इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचे निदर्शने

दिंडोरी । Dindori (प्रतिनिधी)

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीत केलेल्या भरमसाठ दरवाढी विरोधात पेठ तालुका शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आले.

- Advertisement -

शहरातील जुने तहसील कार्यालय चौकात शिवसेनेचे तालुकाप्रमुख भास्कर गावित यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीचा निषेध करत घोषणा देण्यात आल्या.

तसेच केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांबाबत वापरलेल्या अपशब्दाचा तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करीत दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

याप्रसंगी मनोज घोंगे, विलास अलबाड, तुळशीराम वाघमारे, कुमार मोंढे, शाम गावित, मोहन कामडी, नामदेव चौधरी, मनोहर भोये, संतोष डोमे, पद्माकर कामडी, यादव भोये, किरण भुसारे, जगदीश गावित, भारत पवार आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या