Saturday, May 4, 2024
Homeजळगावबोदवड नगरपंचायतीवर भगवा ; माजी मंत्री खडसे, अ‍ॅड.रवींद्र पाटलांना धक्का

बोदवड नगरपंचायतीवर भगवा ; माजी मंत्री खडसे, अ‍ॅड.रवींद्र पाटलांना धक्का

डॉ.पुरूषोत्तम गड्डम

बोदवड । Bodwad

- Advertisement -

दोन टप्प्यात झालेल्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला 17 पैकी 9 जागांवर विजय मिळाला आहे. 07 जागांवर राष्ट्रवादी तर 01 जागा ईश्वरचिठ्ठीमुळे भाजपाला मिळाली आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी कंबर कसूनही शिवसेनेच्या शिलेदारांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बोदवड नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर आणि 18 जानेवारी रोजी दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. आज दि.19 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बोदवड तहसील कार्यालयात मतमोजणीस प्रारंभ झाला होता.

प्रभागनिहाय सविस्तर निकाल

प्रभाग 1 – शिवसेना (सौ.रेखा संजय गायकवाड -466 विजयी), राष्ट्रवादी – (सौ.प्रमिला संजय वराडे 279 पराभूत, भाजपा – (सौ.वैशाली योगेश कुळकर्णी – 73) पराभूत, काँग्रेस (सौ.कुसुम अशोक तायडे – 14) पराभूत.

प्रभाग 02 – राष्ट्रवादी (कडूसिंग भरत आप्पा पाटील – 367) विजयी, शिवसेना (सचिन सुभाष देवकर – 233) पराभूत, भाजपा ( महेंद्र प्रभाकर पाटील – 75) पराभूत, काँग्रेस (अंकेश राजेंद्र अग्रवाल) – 11 पराभूत.

प्रभाग – 03 – राष्ट्रवादी (योगिता गोपाळ खेवलकर – 405) विजयी, शिवसेना (सुजाता देवेंद्र खेवलकर – 383) पराभूत, भाजपा (कविता पवन जैन – 164) पराभूत, वंचित आघाडी (शुभांगी प्रविण मोरे – 05) पराभूत.

प्रभाग – 04 – राष्ट्रवादी (बागवान सईदाबी सय्यद रशीद – 551) विजयी, शिवसेना (कुरेशी सकीनाबी शे.कलीम – 211)पराभूत, भाजपा (मुसलमान जाकीसाबी मुसा – 106) पराभूत.

प्रभाग – 05 भाजपा (विजय बडगुजर – 374) ईश्वरचिठ्ठीने विजयी, राष्ट्रवादी (गोपाल बाबुराव गंगतीरे – 374) पराभूत, शिवसेना (देवेंद्र समाधान खेवलकर) पराभूत.

प्रभाग – 6 – शिवसेना (पूजा प्रितेश जैन – 302) विजयी, राष्ट्रवादी (संदिप सरीता जैन -296) पराभूत, भाजपा (शितल अमोल देशमुख – 176) पराभूत.

प्रभाग 07 – राष्ट्रवादी (सौ.पूजा संदिप पारधी – 244) विजयी, शिवसेना (संजू छनग गायकवाड – 188) पराभूत, भाजपा (मधुकर रामसिंग भरगडे -133) पराभूत.

प्रभाग – 08 – राष्ट्रवादी (शेख एकताबी लतीफ – 411) विजयी, शिवसेना (संदिप मधुकर गंगतीरे – 314) पराभूत, भाजपा (मधुकर रामसिंग भरगडे – 133) पराभूत.

प्रभाग – 09 – शिवसे (आनंदा रामदास पाटील – 506) विजयी, राष्ट्रवादी (नितीन चावदस वंजारी – 106) पराभूत, काँग्रेस (मन्यार शेख सुलतान – 118) पराभूत.

प्रभाग – 10 – शिवसेना (मनिषा कैलास बडगुजर – 380) विजयी, राष्ट्रवादी (रेखा कैलास चौधरी – 355) पराभूत, भाजपा (चंद्रकला प्रदीप तांगडे – 53) पराभूत.

प्रभाग – 11 – शिवसेना ( बेबीबाई रमेश चव्हाण – 439) विजयी, भाजपा (दिशा नरेशकुमार आहुजा – 311) पराभूत, राष्ट्रवादी (रेखा कडू माळी – 88) पराभूत, काँग्रेस (संगिता सुधीर पाटील – 89), पराभूत.

प्रभाग – 12 – शिवसेना (शारदा सुनील बोरसे – 557) विजयी, अपक्ष (कुरेशी बानो शेख असलम – 376) पराभूत, राष्ट्रवादी (उषा रवींद्र माळी – 227) पराभूत.

प्रभाग – 13 – शिवसेना (बागवान सईस इब्राहीम – 567) विजयी, भाजपा ( राहूल रामचंद्र माळी – 273) पराभूत, काँग्रेस ( वाहेद अली समद अली – 225) पराभूत.

प्रभाग – 14 – राष्ट्रवादी (शेख जफर अलताप – 402) विजयी, काँग्रेस (शेख इरफान शेख चांद – 192) पराभूत, शिवसेना (शेख इसराईल – 155) पराभूत.

प्रभाग – 15 – राष्ट्रवादी (शाद मुजम्मील शाह मुजफ्फर -662) विजयी, शिवसेना (पिंजारी शेख तौफीक शेख – 271) पराभूत.

प्रभाग – 16 – शिवसेना (बेबीबाई विनोद माळी – 473) विजयी, राष्ट्रवादी (राजश्री आनंद माळी – 247) पराभूत, काँग्रेस (पिंजारी सलीमाबी – 149) पराभूत.

प्रभाग – 17 – शिवसेना ( मीरा दिगेश माळी – 816) विजयी, राष्ट्रवादी (मोहीनी शुभम माळी -235) पराभूत,

बोदवडला भगवा : खडसेंच्या गडाला सुरुंग : पाहा, राज्यातील महत्वाचे निकाल, एका क्लिकवर

- Advertisment -

ताज्या बातम्या