Thursday, October 31, 2024
Homeब्रेकिंग न्यूजShrinivas Vanga : अज्ञातवासात असलेले आमदार श्रीनिवास वनगा अखेर घरी परतले; म्हणाले,...

Shrinivas Vanga : अज्ञातवासात असलेले आमदार श्रीनिवास वनगा अखेर घरी परतले; म्हणाले, एकनाथ शिंदे मला विश्वासू वाटतात, पण…

मुंबई | Mumbai
शिवसेनेच्या शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने अज्ञातवासात असलेले पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे अखेर घरी परतले आहेत. आमदार वनगा हे चार दिवस अज्ञातवासात होते. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा मागील चार दिवसांपासून नॉट रिचेबल होते. आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा तलासरीतील कवाडे येथील त्यांच्या राहत्या घरी परतले. घरी परतल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी आपल्या मनातली खदखद बाहेर काढली.

षडयंत्र करून माझे तिकीट कापले गेले. पद असले नसले तरी, मी काम करत राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला विश्वासू वाटतात, पण त्यांच्या जवळची लोकं त्यांना मिस गाईड करतात, अशी नाराजी श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

श्रीनिवास वनगा नेमके काय म्हणाले?
१०० तासांपेक्षा अधिक वेळ संपर्कात नसलेले श्रीनिवास वनगा आज आपल्या घरी परतले असून ज्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकच राहणार, असेही ते म्हणाले. शेवटपर्यंत मला आश्वासन देण्यात आली. मात्र माझे तिकीट रद्द करून आयात उमेदवाराला दिली. मात्र माझी काय चूक होती?, मी लोकांची कामे सातत्याने करत आहे. तरीही माझ्यावर हा अन्याय केला गेला, हे पूर्ण षडयंत्र होते. माझे शंभूराजे देसाई यांच्याबरोबर बोलणेही झाले आहे तेही प्रामाणिक आहेत. प्रामाणिकपणाचे फळ असे मिळते का?, असा सवाल श्रीनिवास वनगा यांनी उपस्तित केला.

वनगा यांनी पुढे म्हटले की, राजकारणात प्रामाणिक माणूस चालत नाही. मी माझ्या प्रामाणिकपणाची शिक्षा भोगतोय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी त्यांच्या मर्जीतला उमेदवार देण्यासाठी माझे तिकीट कापले असल्याचा आरोप वनगा यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर काही ना काही कारवाई केली असेल असे मला आशा असल्याचेही वनगा यांनी म्हटले.

मी जिद्दी आहे, प्रामाणिक आहे आणि पुढे माझ्या सामाजिक कामातून हे मी या षडयंत्र रचणाऱ्यांना दाखवून देईल. मी त्यांना सोडणार नाही. माझे काम मी कायमस्वरूपी करत राहील. मला भविष्य आहे. मी भावनेच्या भरात काही बोललो गेलो असेल. मला बरेही वाटत नव्हते आणि माझ्या मित्रांनी मला खूप सांभाळले. परंतु माझा मुलगा आजारी होता असे मला सांगण्यात आले. त्यामुळे शेवटी आज मी घरी आलो. माझा परिवार आहे त्यांचीही मला काळजी आहे. परंतु अशा प्रामाणिक लोकांवर अन्याय होऊ नये असे मला वाटते. असे मत श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या