Monday, July 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधान परिषदेची निवडणूक स्थगित करा; ठाकरे गटाची मागणी

विधान परिषदेची निवडणूक स्थगित करा; ठाकरे गटाची मागणी

मुंबई | Mumbai
विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. विधानसभेतून निवडून द्यायच्या विधान परिषदेतील ११ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. त्यानुसार २५ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून १२ जुलै रोजी मतदान व त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल. मात्र, यानिवडणुकीआधीच शिवसेनाउद्धव ठाकरे गटाने सर्वांनाच धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या १२ जुलैला ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, असे असतानाही विधान परिषद निवडणूक घेणे हे घटनाबाह्य असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी होणाऱ्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा: मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा आता विश्वास नाही; शरद पवारांचे मोदींवर टीकास्र

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटलाही सुरू आहे. आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणे आणि विधान परिषदेचे आमदार निवडून आणणे, हे घटनाबाह्य असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. याचबरोबर, पक्ष फुटल्यानंतर काही आमदारांची प्रतिज्ञापत्रे जी सर्वोच्च न्यायालयात आहेत. त्यामध्ये ते शिवसेना ठाकरे गटात असल्याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार कसा देणार? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे.

याशिवाय पक्ष फुटल्यानंतर काही आमदारांचे प्रतिज्ञापत्र जे सर्वोच्च न्यायालयात आहेत, त्यामध्ये ते ठाकरे गटात असल्याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदे गटात गेलेत. त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार कसा देणार? असा सवाल सुद्धा ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात येणार आहे. या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी ठाकरे गटाकडून केली जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या