Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे गटाच्या खेळीने नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि बजोरिया अडचणीत

ठाकरे गटाच्या खेळीने नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि बजोरिया अडचणीत

मुंबई | Mumbai

राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पहिलं अधिवेशन होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने निलम गोऱ्हे , मनिषा कायंदे, बिपल्व बजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं आहे. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या तिन्ही आमदारांनी पक्ष सोडताना पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. तसेच पक्षातील अनागोंदी कारभारही टीका केली होती. तसेच पक्षातील काही नेत्यांवरही टीकास्त्र सोडलं होतं. या तिघांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिघांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाने तसं पत्रच विधीमंडळ सचिवांना दिलं आहे. त्यामुळे विधीमंडळ सचिव काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Vidhan Sabha Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात ‘हे’ मुद्दे गाजणार

दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाले. काँग्रेस आणि ठाकरे गटाने विधीमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून प्रचंड गोंधळ घातला. यावेळी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. हे सरकारच घटनाबाह्य असल्याचा दावा विरोधकांनी केला. शिंदे सरकार हाय हाय… अशी घोषणाबाजीही विरोधकांनी केली. त्यानंतर विरोधकांनी विधानसभेत शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला. शिंदे सरकार शेतकरी प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे, पण सरकार काहीच करत नसल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवत सभात्याग केला.

Accident News : जम्मूमध्ये जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली

- Advertisment -

ताज्या बातम्या