Saturday, May 4, 2024
Homeजळगावजिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करणार!

जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करणार!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांच्यासह काही आमदारांनी बंडखोरी (MLAs revolt) केल्याने शिवसेना पदाधिकारी (Shiv Sena office bearers) आणि शिवसैनिक (Shiv Sainiks) प्रचंड अस्वस्थ (very upset) झाले आहे. या राजकीय उलथापालथीमुळे राज्यातील सर्वच शिवसेना जिल्हाप्रमुखांची (Shiv Sena district chief) शुक्रवारी तातडीची मुंबई येथील शिवसेना भवनात बैठक (Meeting) घेण्यात आली. या बैठकीनंतर सर्वच जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांनी आपल्या तालुक्यात एकजुटीने काम करुन शिवसेना भक्कम (Shiv Sena strong) करण्यासाठी प्रयत्नशील राहू. जिल्ह्यातील आमदार शिवसेना सोडून गेले तरी आम्ही सर्व संघटीत राहुन जिल्ह्यात पक्ष संघटन मजबुत करुन, शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवू, असा निर्धार (Determination) करुन मोट बांधली आहे.

- Advertisement -

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आमदारांनी बंड पुकारून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. बंडखोर आमदार गुवहाटीमध्ये असून त्यांनी महाविकास आघाडीमधून शिवसेनेने बाहेर पडावे, असा प्रस्ताव दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या सर्व राजकीय घडामोडींमध्ये संपुर्ण राज्यातील शिवसैनिकांप्रमाणेच जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्यामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच जिल्ह्यातील चार आमदारांची अद्यापही त्यांची भुमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

या नेत्यांनी शिवसेनेची साथ सोडल्यास जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी काय करणार असा प्रश्नही शिवसैनिकांना पडला होता. मात्र, कुठल्याही परिस्थितीत शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडायचे नाही, असा पक्का निर्धार सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांसह शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला आहे. शिवसेना पदाधिकारी 23 जून रोजी टॉवर चौकात आंदोलन करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मंबुईच्या शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले.

स्वपक्षातील शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्याचे दु:ख आहे. इतर विरोधकांनी बंड केले असते तर काहीच वाटले नसते, असे सांगताच शिवसेना पक्षप्रमुखांसह सर्व बैठकीला उपस्थित सर्व शिवसेना जिल्हाप्रमुख भावनिक होऊन गेले होते. दि.25 जून रोजी दुपारी 1 वाजता पुन्हा राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक होणार आहे.

सर्व मिळून संघर्ष करु

तुम्ही भावनिक होऊन काम करु नका. लोकांच्या प्रश्नांसाठी निस्वार्थपणे काम करीत रहा. तुम्हा दिलेल्या संधीचे सोने करा,हाच संदेश आम्ही आपल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांपयर्र्ंत पोहोचवून काम करणार असून शिवसेना बळकटीसाठी सर्व मिळून संघर्ष करू,अशा भावना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे, समाधान महाजन यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात सध्या शिवसेनेमध्ये दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार व खासदारांनी अगदी कोणीही असो कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेना व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. शिवसेना एकसंघ ठेवणे हे आमचे सर्व पदाधिकार्‍यांचे काम आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा डौलानेच फडकत ठेवू.

डॉ.हर्षल माने, जिल्हाप्रमुख, शिवसेना

जळगाव जिल्हा शिवसेनेचा मजबूत किल्ला राहिला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेची दमदार फळीही येथे सतत अस्तित्त्व दाखवित राहिली आहे. मात्र, या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसैनिक अस्वस्थ राहिला आहे. सध्या आम्ही मातोश्रीवरून दिलेल्या आदेशाचे पालन करीत राहणार आहे. तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशिल राहू.

विष्णू भंगाळे, जिल्हा प्रमुख शिवसेना

शिवसेना हा पक्ष, पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या शांतपणे घटनाक्रम बघत आहोत. आम्ही शिवसेनेसोबतच राहणार असून मातोश्रीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जे आदेश देतील त्यांचे पालन करु. आज झालेल्या बैठकीत पक्षप्रमुखांनी पक्ष वाढीबाबत सूचना दिल्या आहेत. त्यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी काम करु.

समाधान महाजन,जिल्हाप्रमुख, शिवसेना

- Advertisment -

ताज्या बातम्या