Monday, May 20, 2024
Homeजळगावकांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी शिवसेनेचे आदोलन

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी शिवसेनेचे आदोलन

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट आहे. या निर्णयाविरोधात चाळीसगाव येथे तालुका शिवसेनेतर्फे शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. तसेच शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदनही तहसीलदार मोरे यांना देण्यात आले.

- Advertisement -

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव हा करुणा च्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हा धक्कादायक निर्णय आहे निर्यातबंदीमुळे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमती वाढल्या आहेत, केंद्र सरकारने केलेली निर्यातबंदी ही शेतकर्‍यांना उद्धवस्त करणारी आहे, तरी केंद्र सरकारने हा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आदोलनात चाळीसगाव शिवसेनाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी मोदी सरकार विरोधात मोदी सरकार हाय हाय, निर्यात बंदी झालीच पाहिजे अशा घोषणा सेनेच्या कार्यकर्त्यानी दिल्या. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला भाव मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना चांगला दर मिळत आहे. या निर्यातबंदीमुळे शेतकर्‍यांना नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे तसेच अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून हवालदिल झाला तरी यासाठी चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी पंचनामे होऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी तसेच लवकरात लवकर निर्यात बंदी उठवावी व नुकसानभरपाई शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

आदोलनात शिवसेना जिल्हा प्रमूख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमूख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, तालुका संघटक सुनील गायकवाड, रघुनाथ कोळी, शैलेंद्र सातपुते, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, संजय ठाकरे, प्रभाकर उगले, शेख जावेद, वसीम चेअरमन, संजय पाटील, नाना शिंदे, बापू नवले, अनिल कुडे, दिलीप राठोड, ऋषिकेश देवरे, दिनेश घोरपडे, नंदू गायकवाड, नकुल पाटील, बापू लेणेकर,अजिज मिर्झा, गणेश भवर, धर्मा खंडू काळे, ज्ञानेश्वर शिंदे, संजय पाटील, प्रेमदास पाटील, आधार गायकवाड, रवींद्र चौधरी, दिलीप पाटील, बंटी पाटील, अजित देशमुख, हेमंत निकम, रवींद्र चौधरी, निलेश गायके आदि उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या