Saturday, November 2, 2024
Homeभविष्यवेधनागाच्या फणावर शिवपरिवार

नागाच्या फणावर शिवपरिवार

श्री नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैन येथे श्री महाकालेश्वर मंदिराच्या आत आहे. हे मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीच्या दिवशी भाविकांच्या दर्शनासाठी उघडले जाते. येथे भगवान शिव आपल्या संपूर्ण कुटुंबासह नागाच्या कुशीत विराजमान आहेत.

श्री नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैनमधील श्री महाकालेश्वर मंदिराच्या दुसर्‍या मजल्यावर आहे, ज्याचे दरवाजे नागपंचमीच्या दिवशी वर्षातून एकदाच उघडतात. आज या मंदिरात विधिपूर्वक पूजा केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. हे मंदिर श्रावण शुक्ल चतुर्थीच्या रात्री 12 वाजेपासून ते नागपंचमीच्या रात्री 12 वाजेपर्यंत उघडले जाते. मध्यरात्रीपासूनच येथे भाविकांची गर्दी होऊ लागते. हे मंदिर वर्षातील 365 दिवसात फक्त नागपंचमीच्या दिवशी 24 तास उघडले जाते. त्यानंतर पूजा केल्यानंतर पुन्हा मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. चला जाणून घेऊया मंदिराविषयीच्या खास गोष्टी आणि त्यासंबंधीच्या धार्मिक मान्यता.

- Advertisement -

हिंदू धर्मात शतकानुशतके सापांची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू परंपरेत सापांनाही भगवान शंकराचे अलंकार मानले जाते. श्री महाकाल मंदिराच्या गर्भगृहाच्या वरती ओंकारेश्वर मंदिर आणि त्याही वर श्री नागचंद्रेश्वराचे मंदिर आहे. श्री नागचंद्रेश्वर मंदिरात अकराव्या शतकातील अप्रतिम मूर्ती विराजमान आहे, या मूर्तीमध्ये स्वत: श्री नागचंद्रेश्वर आपल्या सात फणांनी सजले आहेत. त्यासोबत शिव-पार्वती, नंदी आणि सिंह हे दोन्ही गण विराजमान आहेत. हे एकमेव मंदिर आहे जिथे भगवान शिव संपूर्ण कुटुंबासह नागाच्या कुशीत विराजमान आहेत.

असे मानले जाते की माळवा साम्राज्यचे परमार राजा भोज याने 1050 च्या सुमारास हे मंदिर बांधले. यानंतर सिंधिया घराण्यातील महाराज राणोजी सिंधिया यांनी 1732 मध्ये महाकाल मंदिराचा जीर्णोद्धार केला. श्री नागचंद्रेश्वर भगवान यांची मूर्ती नेपाळ येथून आणून येथे स्थापित करण्यात आली. या मूर्तीमध्ये भगवान शिव त्यांचे दोन पुत्र गणेशजी आणि कार्तिक यांच्यासह विराजमान आहेत. मूर्तीच्या शीर्षावर सूर्य आणि चंद्र देखील कोरलेले आहेत.

महादेवाच्या गळ्यात नागाचा हार- परमेश्वराच्या गळ्यात आणि बाहूभोवती भुजंग गुंडाळलेले आहे. असे मानले जाते की, उज्जैन व्यतिरिक्त जगात कुठेही अशी मूर्ती नाही. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर आत प्रवेश केल्यावर श्री नागचंद्रेश्वराची मुख्य मूर्ती म्हणजेच शिवलिंग दिसते. नागपंचमीच्या दिवशी श्री नागचंद्रेश्वर महादेवाचे 24 तास अखंड दर्शन होईल. सोमवारी मध्यरात्री 12 वाजता मंदिराचे दरवाजे बंद होतील.

श्री नागचंद्रेश्वर भगवानची त्रिकाल पूजा

नागपंचमी सणाला भगवान श्री नागचंद्रेश्वराची त्रिकाल पूजा केली जाते. मध्यरात्री 12 वाजता दरवाजे उघडल्यानंतर वाजता पूजा होते. त्यानंतर नागपंचमीच्या रात्री बारा वाजता आखाड्याची पूजा केल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या