Tuesday, September 17, 2024
Homeनगरमाजी आमदाराच्या बुध्दीची किव करावी, तेवढी थोडीच

माजी आमदाराच्या बुध्दीची किव करावी, तेवढी थोडीच

कर्डिलेंवर कारखान्याच्या माजी संचालकांची टिका

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

छत्रपतींचा मालवण येथील पुतळा पडला, अवघा महाराष्ट्र हळहळला. कारण छत्रपती शिवाजी महाराज उभ्या भारताचे महाराष्ट्राचे दैवत आहेत. परंतु, आपल्या शासनाचे अपयश झाकताना, झालेल्या चुकीबद्दल माफी मागण्या ऐवजी तनपुरेंवर आरोप करणार्‍या माजी आमदारांची बुद्धीची किव करावी, तेवढी थोडी आहे. वास्तविक, या घटनेचे एक महाराष्ट्रीयन म्हणून प्रायश्चित्त घेताना आ.तनपुरे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. परंतू, कारखान्याला छत्रपतींचे नाव का दिले नाही? हा खोटा आरोप इतरांवर करीत ‘गिरे तो भी …’ या पद्धतीची भाषा माजी लोकप्रतिनिधी करीत असल्याची टीका कारखान्याचे माजी संचालक गोकुळदास आढाव, नारायण जाधव, माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे यांनी केली आहे.

याबाबत माजी लोकप्रतिनिधींनी शासकीय परिपत्रकाचा जर अभ्यास केला असता तर तोंडघशी पडण्याची वेळ आली नसती. वास्तविक, कर्डिले 1995 पासून आमदार आहेत. एकदा मंत्री झाले होते. शासनाच्या विविध नियमांचा त्यांचा चांगला अभ्यास पाहिजे. त्याचबरोबर जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष व अनेक वर्ष संचालक राहिलेले आहे. बँकेचा व कारखान्याचा अतिशय जवळचा संबंध असल्याने कर्डिलेंनी माहिती घेणे जरुरीचे होते. कारखाना व इतर संस्थांना महापुरुषांची नावे देता येत नाहीत, असे शासन परिपत्रक असून त्यातील नियम 9 अ प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आदींसह महापुरुषांची नावे लावता येणार नाहीत असा स्पष्ट दंडक असल्याचे प्रादेशिक सहसंचालक साखर आर. पी. नाईक यांनी त्याचवेळी राहुरी कारखान्यास दिलेल्या पत्रकात म्हटलेले आहे. त्यामुळे छत्रपतींचे नाव देण्याचा ठराव आम सभेने मंजूर करूनही नामांतर करता आलेले नाही.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत कर्डिले यांनी कारखान्यास दिलेले छत्रपतींचे नाव हातोड्याने तोडून आपल्या आजोबांचे नाव दिल्याचा आमदार तनपुरे यांच्यावर केलेला आरोप केवळ शासनाच्या अपयश झाकून इतरांवर आरोप करण्याचा बालिशपणा आहे. वास्तविक, मालवण येथील घटना ही अक्षम्य असून त्यावर माफी न मागता केवळ राजकीय हेतू ठेवून आ. तनपुरेंवर आरोप करण्यात धन्यता मानणार्‍या भाजपाच्या माजी लोकप्रतिनिधीची बुद्धीची किव करावी तेवढी थोडी आहे. असेही त्यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त आणि फक्त राजकारण करणार्‍या माजी लोकप्रतिनिधीला आता राहुरीकर चांगल्या प्रकारे ओळखतात. राजकीय हौस भागवायचीच असेल, तर अभ्यास करून नंतर इतरांवर आरोप करण्याचा खटाटोप करावा, असा सल्ला गोकुळदास आढाव, ताराचंद तनपुरे व नारायण जाधव यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या