Friday, November 15, 2024
Homeराजकीयराज्यात भाजपचे सरकार येणार

राज्यात भाजपचे सरकार येणार

अहमदनगर |वार्ताहर| Ahmednagar

थोड्याच दिवसांत राज्यामध्ये भाजपचे सरकार येणार असून यामुळे नगरमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे

- Advertisement -

अनेक नगरसेवक आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचा दावा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच कर्डिले यांच्या दाव्यामुळे नगरचे राजकारणही ढवळून निघाले.

नगर येथील शासकीय विश्रामगृहावर कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्यामध्ये रविवारी बैठक झाली. या बैठकीनंतर ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे लोक आमच्या संपर्कात आहेत. थोड्याच दिवसांत राज्यात भाजपचे सरकार येणार आहे, हे त्यांना माहित आहे. देशात आमचे सरकार आहे. त्यामुळे थोड्याच दिवसांत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक आमच्यासोबत येतील.

स्थायी समिती सभापतीच्या निवडीच्या आदल्यादिवशी भाजपच्या नगरसेवकाने राष्ट्रवादीत जाऊन सभापतिपद पटकावले. याबाबत कर्डिले म्हणाले, ते त्यांच्या स्वार्थासाठी किंवा पदासाठी तिकडे गेले असावेत. त्याबाबतचा सविस्तर खुलासा शहाराध्यक्ष व महापौर यांनी केला आहे.

संबंधित नगरसेवकांवर काय कारवाई करायची, याबाबत शहराध्यक्ष निर्णय घेतील. बर्‍याच दिवसांत आमची भेट नव्हती. त्यामुळे आज आम्ही एकत्र येऊन चर्चा केली आहे. सभापती निवडीचा आणि आमच्या बैठकीचा काही संबंध नाही. अनेकवेळा आम्ही असे भेटत असतो. या बैठकीत स्थायी समिती सभापती निवडणुकीबाबत चर्चा झाली नसल्याचे कर्डिले यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या