Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअभिनेते शिवाजी साटम यांना राज्य शासनाचा 'हा' मानाचा पुरस्कार जाहीर! या कलाकारांचा...

अभिनेते शिवाजी साटम यांना राज्य शासनाचा ‘हा’ मानाचा पुरस्कार जाहीर! या कलाकारांचा ही होणार सन्मान

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने चित्रपटसृष्टीत दिलेल्या विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाकडून सिनेविश्वातील दिग्गज मंडळींचा सन्मान केला जोता. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच या मानाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे.

- Advertisement -

अभिनेते शिवाजी साटम यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक तसंच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर झाला आहे. स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन. चंद्रा यांना जाहीर करण्यात आला आहे.

“सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.!! राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे या शुभेच्छा” अशी एक्स पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवार यांनी विजेत्यांचं अभिनंदन केले आहे.

शिवाजी यांनी ‘वास्तव’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘चायना गेट’, ‘टॅक्सी नंबर 9211’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘नायक’, ‘सूर्यवंशम’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. त्यांना ‘सीआयडी’ या मालिकेने केवळ वेगळी ओळखच नाही दिली, तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांच्या नावाला समाविष्ट केले.

यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची आणि बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या