Saturday, May 4, 2024
HomeजळगावPhotos # शिवाजीनगर हुडको परिसर चॉपरने भोसकून तरुणाचा खून

Photos # शिवाजीनगर हुडको परिसर चॉपरने भोसकून तरुणाचा खून

जळगाव jalgaon

शहरातील शिवाजीनगर हुडको (Shivajinagar HUDCO) परिसरात काल झालेल्या वादातून मोहम्मद मुसेफ शेख इसाक (Mohammed Musef Sheikh Isaac) वय-४० रा.हुडको यांचा चॉपरने भोसकून (chopper stabbed) खून (murder) केल्याची घटना सोमवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

पोलिसांनी मारेकरी अझरोद्दीन शेख अलीमोद्दीन (Assassin Azharuddin Sheikh Alimoddin) (२८ रा. हुडको) याला अटक (Arrested) केली केली. दहा दिवसांत शहरात तिसरा तर हुडको परिसरात दुसरी खुनाची (murder) घटना घडल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी अनैतिक संबंधातून (immoral relationship) चोवीस तासात दोन खुनाच्या (murder) घटनांनी शहर हादरून गेले होते. या घटनेची धग शांत होत नाही तोच आज पुन्हा शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरातील बर्फ फॅक्टरी गवळीवाडाजवळ मोहम्मद मुसेफ शेख इसाफ (Mohammed Musef Sheikh Isaac) या मनोरुग्ण तरुणाचा चॉपर भोसकून निर्घृण खून (murder) केला. मारेकऱ्याने संतापाच्या भरात मुसेफ याच्या पोटावर, छातीवर भोसकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत मुसेफ हा हमाली काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. परंतु त्याचे मानसिक संतुलन (Mental balance) ठीक नसल्याने ते गेल्या वर्षभरापासून तो घरीच असल्याची माहिती त्याचा भाऊ याने दिली.

शिवीगाळ करीत असल्याने झाला होता वाद

मयत मुसेफ याचे मानसीक संतुलन ठीक नसल्याने तो परिसरात फिरत होता. रविवारी तो परिसरात फिरत असतांना तो शिवीगाळ करीत होता. या कारणामुळे त्याचा काल अझरोद्दीन शेख अलीमोद्दीन याच्या सोबत वाद (Argument) झाला होता. परंतु नागरिकांनी मध्यस्ती करीत त्यांचा वाद मिटवला होता.

फिरतांना दिसताच चॉपरने भोसकले

आज सकाळपासून मारेकरी अझरोद्दीन शेख (Assassin Azharuddin Sheikh Alimoddin) मयत मुसेफ याचा शोध घेत होता. दरम्यान रात्री 8 वाजेच्या सुमारास मयत मुसेफ या बर्फ फॅक्टरी जवळ दिसताच अझरोद्दीन शेख याने त्याच्या जवळ असलेल्या चॉपरने भोसकून त्याचा निर्घृण खून (murder) केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांची घटनास्थळी धाव

रात्रीच्या नमाजसाठी (prayers) नागरिक जात असताना त्यांच्या लक्षात ही घटना आली. त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना(police) दिली. माहिती मिळताच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पथक पोहचले त्यांनी घटनेचा पंचनामा (Panchnama) करून मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविला.

घटनास्थळहून साहित्य जप्त

मारेकऱ्याने वार केल्यानंतर मुसेफचा मृतदेह (Corpses) रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. मृतदेहजवळून चॉपरचे कव्हर, एका शस्त्राची मूठ, रुमाल असे साहित्य पडले होते. पोलिसांनी ते हस्तगत केले आहे.

अवघ्या काही वेळातच संशयिताला अटक

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (local crime branch) तपासचक्रे फिरवली. या प्रकरणी संशयित अझरोद्दीन शेख अलीमोद्दीन (२८ रा. हुडको) याला अटक (Arrested) केली. त्याने देखील गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

तिसऱ्या खुनाच्या घटनेने शहर हादरले

आठवडाभरपूर्वी समता नगर व शिवाजी नगर हुडको परिसरात अनैतिक संबंधातून दोन तरुनाचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेची धग कायम असतानाच आज पुन्हा हुडको परिसरात पुन्हा खूनाची घटना घडली. या घटनांमुळे संपूर्ण शहर हादरून गेले होते. मयत मुसेफयांच्या पश्चत आई, पत्नी, चार मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी मुसेफयांची पत्नी व मुले कामानिमित्त पुणे येथे गेले होते. त्यामुळे ते आपल्या आईसोबत राहत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या