Monday, May 27, 2024
Homeजळगावशिवाजीनगर हुडकोवासियांचा महापालिकेवर धडक मोर्चा

शिवाजीनगर हुडकोवासियांचा महापालिकेवर धडक मोर्चा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शिवाजी नगर (Shivajinagar) भागातील हुडको (Hudko) हा परिसर गेल्या 15 ते 20 वर्षापासून शहराबाहेर बसविण्यात आलेला असून या परिसरातील नागरिकांना आजपर्यंत अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. याबाबत स्थानिक नगरसेवक अथवा मनपाकडून या परिसरातील नागरिकांच्या समस्या (Troubled by problems) सोडविल्या गेलेल्या नाही. रात्री-अपरात्री येणारे पाणी, गटारी, पथ दिवे या विविध समस्या सोडविण्यात यावे, या मागण्यांसाठी मनसेच्या पदाधिकार्‍यांसह (Office bearers of MNS) शिवाजीनगर हुडको परिसरातील नागरिकांनी (Citizens) महापालिका (Municipality) आवारात मोर्चा काढून (March in the premises) आंदोलन केले. विविध घोषणाबाजी करीत महापालिका प्रशासनाला यावेळी निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

शिवाजी नगर हुडको भागामधील राहणारे नागरिक हे हातमजुरी करुन आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी विशेष करुन महिला व पुरुष हे कामानिमित्ताने शहरात येतात. तसेच हा मजूर वर्ग थकून भागून आल्यानंतर रात्री लवकर झोपत असतो. अशी परिस्थितीत असतांना या परिसरात मनपाकडून रात्रीच्या वेळी म्हणजे साधारण 2 ते 2.30 वाजेच्या दरम्यान नळांना पाणी सोडण्यात येते व पाणी भरण्यासाठी विशेष करुन महिलांना उठावे लागत असते. त्यामुळे त्यांची झोपमोड होते. दुसर्‍या दिवशी त्यांना कामाला जाता येत नाही. तरी या भागात दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यान सोडण्यात यावे. जेणेकरुन महिलांना होणारा त्रास थांबेल.

या भागामध्ये आजपर्यंत स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी कामावरुन महिला वर्ग घरी येत असतो व संपूर्ण परिसरात रस्त्यावर अंधार असतो. यामुळे एखाद्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. तरी या परिसरात लवकरात लवकर चौका चौकामध्ये हायमस्ट लॅम्प बसविण्यात यावे. या परिसरामध्ये मनपाकडून गटारी तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु, या गटारींचे साफसफाई होत नसल्याने त्या पाण्याने भरुन ते पाणी रस्त्यावर वाहत असते. त्यामुळे या परिसरातील गटारींची नियमित साफसफाई करण्यात यावी.

ज्या गटारी तुटलेल्या आहेत त्यांची सुध्दा डागडुजी करुन मिळावी, शिवाजी नगर हुडको भागामधील आजपर्यंत रस्ते तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील लोकांना पावसाळ्याच्या दिवसात खूपच त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात लवकरात लवकर पक्के सिमेंट क्रॉक्रीटचे रस्ते तयार करुन मिळावे.

जोपर्यंत रस्ते तयार होत नाहीत तोपर्यंत जागोजागी रस्त्यावर मुरुम टाकूनरस्त्याची झालेली दुरावस्था व्यवस्थित करण्यात यावी. शिवाजीनगर हुडको भागामधील रहिवाश्यांसाठी शौचालये बांधण्यात आलेली आहे, परंतु या शौचालयाच्या चेंबर्सची नियमित साफसफाई होत नसल्याने ते चोकअप झालेले आहेत. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे.

तसेच नागरिकांचे आरोग्य सुध्दा त्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी सदरील शौचालयाचे चेबर्सची नियमित स्वच्छता करण्यात यावी. येत्या 10 दिवसांच्या आत समस्या न सोडविल्यास मनसे व शिवाजी नगर हुडको परिसरातील त्रस्त नागरिक मनपासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला आहे.

या आंदोलनात मनसे जिल्हा संघटक राजेंद्र निकम, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे, योगेश पाटील, बंटी शर्मा, महेंद्र सपकाळे, महेश माळी, विकास पाथरे, विशाल कुमावत, गोविंद जाधव, संतोष सुरवाडे, मनोज खुडे, नूतन शिंपी, निलेश खैरनार, अविनाश जोशी, सागर पाटील यांच्यासह शिवाजीनगर हुडको भागामधील नागरिक सहभागी होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या