Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभा अध्यक्षांच्या नोटीशीला ठाकरे गटाचा ठेंगा; उत्तर न देण्याची भूमिका

विधानसभा अध्यक्षांच्या नोटीशीला ठाकरे गटाचा ठेंगा; उत्तर न देण्याची भूमिका

मुंबई | Mumbai

शिवसेना आमदार (Shivsena MLA Disqualification) अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी (Vidhansabha Adhyaksha) बजावलेल्या नोटीशीला शिवसेनेने (ठाकरे गट) (Thackeray Group)उत्तर न देण्याची भूमिका घेतली आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निर्णय दिल्यानंतर, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती, याबाबत १४ दिवसात उत्तर देण्यास सांगितलं होते, मात्र मुदत संपून सुद्धा ठाकरे गटाच्या आमदारांनी उत्तर दिलेले नाही.

- Advertisement -

शिवसेना शिंदे गटाच्या (Shinde Group) १६ आमदारांच्या अपात्रच्या संदर्भात आम्ही कारवाईची मागणी केली असताना यामध्ये १६ आमदारांनीच नोटिशीला उत्तर देणे गरजेचे असल्याचे मत ठाकरे गटाकडून मांडण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या इतर आमदारांनी नोटिशीला उत्तर देण्याची गरज नसल्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.

Rahul Defamation Case : ‘त्या’ प्रकरणातील राहुल गांधींची याचिका मंजूर ; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

त्याचबरोबर, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून अनेकदा स्मरण पत्र देखील दिली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिलेत. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह इतर आमदरांना नोटीस दिली होती.

Bacchu Kadu : बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला, कारण…

शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आम्ही कारवाईची मागणी केली होती. यामध्ये १६ आमदारांनीच नोटीसला उत्तर देणे गरजेचे आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्या नोटीसला उत्तर देणार नसल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या