छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे बघायला मिळालं आहे.
आदित्य ठाकरे राहत असलेल्या हॉटेलबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. आदित्य ठाकरेंना विरोध करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते त्यांच्या हॉटेलबाहेर जमले होते.
हे हि वाचा : महिलांनो 5 लाखांची मदत मिळणार, ‘लखपती दीदी’ योजना नक्की आहे तरी काय? कसा करायचा अर्ज?
त्यावेळी घोषणाबाजी करताना ठाकरे गट आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी हाणामारीही झाली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला.
दरम्यान, या घटनेबाबत अंबादास दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “या परिस्थितीला पोलीस जबाबदार आहेत. त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी होती, जी त्यांनी घेतली नाही. यासंदर्भात मी काल रात्री पोलीस आयुक्तांना फोन केला होता. मात्र, तरीही त्यांनी दखल घेतली नाही, असे ते म्हणाले. तसेच पोलिसांनी केवळ शिवसेनेच्या ( ठाकरे गट) कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पोलीस भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नाही”, असा आरोपही त्यांनी केला.
हे हि वाचा : काय आहे श्रीकृष्ण अष्टमी साजरा करण्यामागचा इतिहास ?