Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्याCrime News : शिवसेना शाखाप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या

Crime News : शिवसेना शाखाप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या

उल्हासनगर | Ulhasnagar

- Advertisement -

येथील कॅम्प क्रमांक पाच या भागात शिवसेना शाखाप्रमुखाची (Shiv Sena Branch Chief) पाच ते सहा जणांनी निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शेख यांना नुकतेच शिंदे गटाचे शाखाप्रमुख पद देण्यात आले होते…

नाशिक कृउबा समितीच्या सभापतीपदी देविदास पिंगळे, उपसभापतीपदी खांडबहाले

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शब्बीर शेख (Shabbir Shaikh) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून पूर्व वैमन्यासातून हत्या केल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांनी चॉपर, तलवार अशा धारदार हत्यारांचा वापर केल्याचे निदर्शनास आले असून शेख यांच्यावर दहा ते बारा वार केले. यानंतर शेख यांना पुढील उपचारासाठी कल्याण येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू (Death) झाला.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांचे मोठे विधान

दरम्यान, याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात (Hill line Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशियत आरोपींचा तपास करत आहेत. तसेच या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या