Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्यानवा वाद पेटणार? ठाकरेंच्या ‘या’ चिन्हांवर शिंदे गटाचाही दावा

नवा वाद पेटणार? ठाकरेंच्या ‘या’ चिन्हांवर शिंदे गटाचाही दावा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातली लढाई निवडणूक आयोगात पोहोचली. त्यानंतर आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नावच गोठवलं आणि दोन्ही गटांना नवी नावं आणि चिन्हं सादर करण्याचे आदेश दिले. आता या नव्या चिन्हांवरुन पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाकडून आयोगाला तीन संभावित चिन्ह सुचवण्यात आली आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल, अशा तीन चिन्हांचाही पर्याय ठाकरे गटाकडून आयोगाकडे सादर करण्यात आला आहे.

त्यानंतर आता शिंदे गटाकडूनही आयोगाकडे चिन्हे सादर करण्यात आली आहेत. यात, त्रिशुळ, गदा आणि उगवता सुर्य, अशी चिन्हे सादर केली आहेत. पण आता यावरुनही शिंदे-ठाकरे संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरेंनी दिलेल्या मशाल आणि उगवता सुर्य या चिन्हांचा पर्याय शिंदे गटाकडूनही देण्यात आला आहे.

आता निवडणूक आयोग चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग ठाकरे आणि शिंदेंना कोणतं चिन्ह देणार या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

एकीकडे चिन्हाचा वाद असतानाच ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टातही दाद मागितली आहे. याची सुनावणी आजच घेतली जावी, अशी शक्यता होती. मात्र ही सुनावणी आज होणार नसून उद्या होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग आज चिन्हाबाबत निर्णय घेणार का, यावरही अनेक गोष्टी अवलंबून राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या