Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्याVideo: दैवत आपला ठाकरे...; दसरा मेळाव्यानिमित्त ठाकरे गटाकडून नवं गाणं रिलिज

Video: दैवत आपला ठाकरे…; दसरा मेळाव्यानिमित्त ठाकरे गटाकडून नवं गाणं रिलिज

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुंबईत उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या (Shivsena Dasara Melava) निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. एकीकडे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधले परस्परविरोधी गट एकमेकांच्या समोर शड्डू ठोकून उभे असतानाच दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना विरुध्द शिवसेना असा राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरु होण्याची शक्यता आहे.

दोन्ही गटाकडून त्यांच्या त्यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज करण्यात आले आहेत. नुकतेच ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) आपल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एक गाणे लाँच केले (New Song Released)असून त्यात बाळासाहेब ठाकरेंनी आमदार बंडखोरीबाबत केलेल्या भाष्याचा समावेश करण्यात आला आहे. ठाकरे गटानं ‘दैवत आपलं ठाकरे’ या नावाने दसरा मेळाव्यासाठी नवीन गाणे लाँच केले आहे.

पक्ष आपला ठाकरेss, चिन्ह आपलं ठाकरेsss ‘दैवत आपलं ठाकरे’, असे गाण्याचे बोल आहेत. शिवसेनेतील फूट, बाळासाहेबांचे विचार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वाटचाल याबाबत या गाण्यातून भाष्य केले आहे.

काय आहे गाणे

“ठाकरे ह्या नावाची ताकदच अशी आहे की ते नाव पाठीशी असल्यावर जगातल्या कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायची शक्ती निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनगटात येते. कधीही न आटणारा उर्जेचा आणि मायेचा स्रोत म्हणजेच तमाम निष्ठावान शिवसैनिकांचं दैवत ‘ठाकरे’! ह्याच दैवतावरच्या प्रेमापोटी शिवसैनिकांनी अर्पण केलेलं हे नवीन गीत..’दैवत आपलं ठाकरे’!, असे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.

“उद्या जर तुमच्या हातात सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर एक सांगतो, यापुढे शिवसेनेचा एकही आमदार फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा”, असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

कशी असणार व्यवस्था

दरम्यान, शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचे जोरदार नियोजन करण्यात आले असून नियोजनाची संपुर्ण जबाबदारी ही जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुखांना देण्यात आली आहे.

राज्यभरातील तळागाळातील शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर येण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना शिवतीर्थापर्यंत आणण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्यातील संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना देण्यात आली आहे. यासोबतच मेळाव्यासाठी येणाऱ्यांसाठी राज्यभरातील तळागाळातील शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर येण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना शिवतीर्थापर्यंत आणण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्यातील संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना देण्यात आली आहे.

तसेच मेळाव्यासाठी येणाऱ्यांसाठी ठाकरे गटाकडून पार्किंगपासून ते शिवतीर्थ यासाठी विशेष पिकप ड्रॉपची सोय करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहन उभी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या