श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कुरघोडीच्या राजकारणाची कायम चर्चा होत असतानाच ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते साजन पाचपुते संचालक मंडळाच्या मागील तीन सभेला गैरहजर असल्याने त्याचे संचालक पद रद्द करण्याचा ठराव सोमवारी (दि.24) झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सभापती प्रवीण उर्फ अतुल लोखंडे यांनी दिली. श्रीगोंदा बाजार समितीची मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेतील विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते संमत करण्यात आले.
विषय पत्रिकेतील विषयानुसार बाजार समितीच्या 25 ऑक्टोबर 2024, 27 डिसेंबर 2024 व 25 फेब्रुवारी 2025 ला झालेल्या सलग तीन मासिक सभेस गैरहजर असणारे संचालक साजन सदाशिव यांचे संचालक पद रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सभापती लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी उपसभापती मनिषा मगर, दिपक भोसले, दत्तात्रय पानसरे, भास्करराव वागस्कर, अजित जामदार, नितीन डुबल, बाबासाहेब जगताप, रामदास झेंडे, अंजली रोडे, दत्तात्रय गावडे, महेश दरेकर, साजन पाचपुते, लक्ष्मण नलगे, प्रशांत ओगले, लौकीक मेहता, आदिक वांगणे, किसन सिदनकर यांच्यासह सर्व 18 संचालक उपस्थित होते.