Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनाशिक लोकसभा : भाजपच्या खेळीने शिवसेनेची कोंडी? आण्णांना हवा बदल, आप्पांचे काय?

नाशिक लोकसभा : भाजपच्या खेळीने शिवसेनेची कोंडी? आण्णांना हवा बदल, आप्पांचे काय?

नाशिक | फारुख पठाण | Nashik

देशातील उत्तर प्रदेशच्या ८० जागानंतर महाराष्ट्रातील (Maharashtra) ४८ लोकसभेच्या जागा भाजपला (BJP) हव्या आहेत. यामुळे मिशन ४५ प्लस सुरू करुन राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वतंत्र संपर्क नेता नेमण्यात आला आहे. नाशिक लोकसभेची (Nashik LokSabha) जागा देखील भाजपसाठी महत्वाची आहे. मात्र युतीत नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्याने पडद्यामागून भाजपच्या वतीने खेळी सुरू करुन दिनकर पाटील (Dinkar Patil) यांच्या रुपाने नाशिकच्या जागेवर दावा ठोकण्यात येत आहे. यामुळे सेनेची कोंडी होण्याची शक्यता नकारता येत नाही.

- Advertisement -

सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील हे सोशल मिडियावर (Social Media) कमालीचे अ‍ॅक्टीव्ह झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या फॅन क्लबकडून जोरदार प्रचार सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यांच्या समर्थकांना नाशिकमध्ये (Nashik) बदल करायचा असल्याचे उल्लेख असणाऱ्या पोस्ट टाकण्यात येत असल्याने जागा वाटपापर्यंत हे वाद कसे पोहोचणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Maratha Reservation : अजित पवार गटाच्या आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक

देशासह राज्यात सर्वत्र आता लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या दोन्ही निवडणुकांची तयारी जोमाने सुरू केली आहे. सत्ताधारी एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडी (India Alliance) तयार केली आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्यांमध्ये सरळ लढत अपेक्षित आहे. मात्र या दोन्ही आघाडीच्या नेत्यांना शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटी नंतर जागा वाटप करणे डोकेदुखीचे ठरणार आहे. त्यामुळे जे नेते नाराज होतील त्यांच्यावर इतर छोट्या पक्षांची नजर टिकून आहे.महाराष्ट्रात शिवसेना व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे तयार झाले आहे. विशेष म्हणजे एक शिवसेनेचा गट व एक राष्ट्रवादीचा गट भाजप बरोबर तर एक काँग्रेस बरोबर आहे. त्यामुळे संभ्रम वाढले आहे. जर आपण नाशिकचा विचार केला तर या ठिकाणी देखील जागा वाटपमध्ये गोंधळ होण्याची शक्यता नकारता येत नाही.

नाशिकसह दिंडोरी व धुळे (मालेगांव) असे जिल्ह्याला साधारण अडीच खासदार व शहरासह एकूण जिल्ह्यात १५ आमदार आहेत. लोकसभेत नाशिकची जागा शिवसेनेकडे असून धुळे (मालेगांव) व दिंडोरी भाजपकडे आहे. सेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय गणिते बदलली आहे. भाजपकडील मालेगांव धुळे मतदारसंघातून सेनेचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे चिरंजीव अविष्कार भुसे हे इच्छुक असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे येथेही पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तर सेनेकडे असलेल्या नाशिकमधून भाजप नेते दिनकर पाटील कमालीचे कामाला लागले आहे. पाटील यांना भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी शब्द दिल्याची चर्चा आहे. यामुळेच त्यांचा फलक विविध कारणांनी शहरासह संपूर्ण लोकसभा क्षेत्रात दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सोशल मिडियात देखील त्यांनी एक प्रकारे आघाडी घेतली आहे. पाटील यांना पुढे करुन भाजपने खेळी केल्याची देखील चर्चा आहे. जर असे झाले तर विद्यमान खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे नाशिकची निवडणूक आतापासूनच रंगतदार होतांना दिसत आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा जीव घ्यायचा आहे का? हंबरडा फोडत महिला आंदोलकाचा सरकारला सवाल

‘इंडिया’तही घोळ

पुर्वीच्या युती व आघाडीचा विचार केल्यास युतीत नाशिकची जागा सेनेकडे आहे. तर आघाडीत राष्ट्रवादीकडे मात्र आता राष्ट्रवादी (अजीत पवार) व सेनासह भाजप एकत्रित असल्याने व त्याच भाजप देखील अप्रत्यक्ष दावा ठोकल्याचे या रस्सीखेचमध्ये कोण बाजी मारतो, याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीला देखील नाशिकच्या जागेवरुन मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण महाविकास आघाडी तयार झाल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) सोबत आता शिवसेना ठाकरे गट देखील आहे. मागील १० वर्षापासून नाशिकच्या जागेवर सेनेचा कब्जा आहे. आता ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे नाव आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी (शरद पवार) कडून अ‍ॅड.नितिन ठाकरे, गोकुळ पिंगळे आदींची नावे चर्चेत आहे. मनसेनेकडून माजी नगरसेवक दिलीप दातीरांचे तर स्वराज्य पक्षाकडून स्वत: छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव चर्चेत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; केली ‘ही’ मागणी

- Advertisment -

ताज्या बातम्या