Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्यासुप्रिया सुळेंनी मटण खाऊन घेतलं देवदर्शन; शिवसेनेच्या नेत्याकडून टीकास्त्र

सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन घेतलं देवदर्शन; शिवसेनेच्या नेत्याकडून टीकास्त्र

मुंबई | Mumbai

शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावावरून राज्यातील राजकारण तापलेले असताना शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेल यांनी केला आहे. शिवतारे यांनी फेसबूकवर सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ शेअर करत हा आरोप केला आहे. शिवतारे यांच्या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यावर कमेंट केली आहे. आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला||, अशी टीका शिवतारे यांनी केली आहे.

Watermelon : लालेलाल-रवाळ कलिंगड कसं निवडाल? सोप्या टिप्स जाणून घ्या…

गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबतही असाच प्रकार घडला होता. तेव्हादेखील राजकीय विरोधकांनी पवार घराण्याला लक्ष्य केले होते. शरद पवार यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे मंदिराबाहेरून दर्शन घेतले होते. त्यांना याचे कारण विचारताच त्यांनी म्हटले होते की, ‘मी आज नॉनव्हेज खाल्ले असल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही’. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय विरोधकांनी शरद पवार हिंदूविरोधी, धर्म न मानणारे असल्याची टीका सुरु केली होती.

…म्हणून माझ्यावर हल्ला झाला; संदीप देशपांडेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

- Advertisment -

ताज्या बातम्या