Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्याAjit Pawar : "...म्हणून अजित पवार शरद पवारांपासून दूर गेले"; शिवसेनेच्या 'या'...

Ajit Pawar : “…म्हणून अजित पवार शरद पवारांपासून दूर गेले”; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षात बंड करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Eknath Shinde and Devendra Fadnavis) सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला होता. तर अजित पवारांच्या या राजकीय निर्णयामुळे राष्ट्रवादी पक्षासह पवार कुटुंब देखील दुभंगल्याचे पाहायला मिळाले होते.

- Advertisement -

Bus Accident News : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २९ प्रवाशांसह खासगी बस पूलावरून कोसळली

दुसरीकडे शरद पवारांचे बोट पकडून राजकारणात आलेल्या अजित पवारांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला असावा. यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गटांकडून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. अशातच आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी अजित पवार शरद पवारांपासून दूर का गेले? याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भाजपला झटका! दक्षिणेतील मोठ्या मित्रपक्षानं सोडली साथ, लोकसभेपूर्वी चिंता वाढली

शिवसेनेच्या शिंदे गटाचे (Shinde Group) नेते नरेश म्हस्के यांनी म्हटले की, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे (Rohit Pawar and Supriya Sule) यांच्यामुळे अजितदादांसारखा माणूस शरद पावरांपासून दूर गेला आहे. प्रथम बारामतीमधून सुप्रिया सुळे यांचे काय होईल याकडे लक्ष द्यावे मग श्रीकांत शिंदेंच काय होणार याची काळजी करावी. रोहित पवारांची अवस्था काय आहे हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल. तुम्ही अजितदादा आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वासमोर आपण आधी बारामती (Baramati) लढवून दाखवा, त्यानंतर आम्हाला आव्हान किंवा सल्ले द्या, असे म्हस्के यांनी म्हटले आहे.

Asian Games 2023 मध्ये टीम इंडियाचा बोलबाला! सिंगापूरवर 16-1 ने शानदार विजय

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी नागपूरमध्ये आलेल्या पूरस्थितीवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर देखील नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, संजय राऊत हे बाष्कळ बडबड करतात. एक बोट जेव्हा आपण दुसऱ्याकडे करतो तेव्हा चार बोट आपल्याकडे असतात याचे भान त्यांनी ठेवायला हवे. नागपुरात ४ तासांत ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने इतके पाणी आले. नागपूरमधील पूरस्थिती हाताळण्यासाठी तिथले नेते सक्षम आहेत. मात्र मुंबईमध्ये २४ वर्षे आपली सत्ता होती. तेव्हा थोडासा पाऊस पडला तरी संपूर्ण मुंबई (Mumbai) पाण्यात बुडायची, लोकल बंद होत होत्या. पंरतु, यावर्षी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले आणि यंदा मुंबईत कुठेही पाणी तुंबले नाही, असे म्हस्के यांनी म्हटले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Accident News: स्कुल बस – रिक्षाचा भीषण अपघात; पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या