मुंबई | Mumbai
शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांसमोर गुरुवार (दि.१४ सप्टेंबर) रोजी पहिली सुनावणी पार पडली होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटाच्या आमदारांची (MLA) कागदपत्रे तपासली होती. यावेळी शिंदे गटाकडून कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून दहा दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र, ठाकरे गटाने (Thackeray Group) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे वेळकाढू पणा करत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती…
Asian Games 2023 : भारतीय महिला संघाची ‘सुवर्ण’ कामगिरी; श्रीलंकेचा १९ धावांनी केला पराभव
ठाकरे गटाच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) काही दिवसांपूर्वी नुकतीच सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीवर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले होते. तसेच एका आठवड्यात आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सुनावणीसाठी वेग आला असून आज (२५ सप्टेंबर) रोजी दुपारी तीन वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये आमदार अपात्रता प्रकरणातील (MLA disqualification) दुसरी सुनावणी सुरु झाली आहे.
Chandrashekhar Bawankule : “आपल्या विरोधात बातम्या येऊ म्हणून पत्रकारांना…”; बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
ही एक प्रकारे नियमित सुनावणी जरी असली तरी याकडे प्रक्रियात्मक दिशात्मक सुनावणी म्हणून पाहिले जाणार आहे. तसेच विधानभवनात सुनावणीसाठी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत, शिंदे गटाचे वकील अनिलसिंह साखरे उपस्थित आहेत. याशिवाय ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, सुनील प्रभू, हे मुबंईतील आमदार देखील उपस्थित आहेत. सुरुवातीला दोन्ही गटाकडून म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर एकूण ३४ याचिका आहेत. या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित होणार आहे.
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना जीएसटी आयुक्तालयाचा दणका; वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
दरम्यान, शिंदे गटाकडून (Shinde Group) शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsath) विधानभवनात दाखल झाले आहेत. ते सुनावणीसाठी उपस्थित झालेले पहिलेच आमदार आहेत. तर सर्व याचिकांवर एकाचवेळी सुनावणी घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. परंतु, शिंदे गटाने सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी नको, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केल्याची माहिती समोर आली आहे.
Nashik Rain News : नाशकात पावसाची तुफान हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ