Wednesday, May 22, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना नेमकी कुणाची? आमदार अपात्रतेसंदर्भात नवी अपडेट समोर; आज 'इतक्या' वाजता होणार...

शिवसेना नेमकी कुणाची? आमदार अपात्रतेसंदर्भात नवी अपडेट समोर; आज ‘इतक्या’ वाजता होणार सुनावणी

मुंबई | Mumbai

शिवसेना आमदार अपात्रता याचिकेच्या सुनावणी प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दोन प्रतिस्पर्धी गटांतील ५४ शिवसेना आमदारांना नव्यानं नोटीस बजावून आज दुपारी ३ वाजता विधानभवनात सुनावणीसाठी बोलावले आहे….

- Advertisement -

विधानसभेत आमदार अपात्र प्रकरणाची पहिली सुनावणी १४ सप्टेंबर रोजी झाली होती, त्यानंतर आता या प्रकरणाची दुसरी सुनावणी सोमवारी म्हणजेच आज दुपारी ३ वाजता घेतली जाणार आहे. या सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभेपूर्वीच्या सर्व अपात्रतेच्या याचिका एकत्र करून ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या समोर १४ सप्टेंबरसा सुनावणी पार पडली. या सुनावणीत दोन्ही गटांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजून ऐकून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना कागदपत्रांच्या देवाणघेवाणीसाठी एका आठवड्याचा वेळ दिला होता. त्यानंतर १८ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी न्यायालयाने राहुल नार्वेकरांना सुनावले.

या प्रकरणातील सुनावणीमध्ये वेळकाढूपणा का करताय असे खडे बोल न्यायालयाने राहुल नार्वेकरांना सुनावले होते. त्यानंतर नार्वेकरांनी काल तातडीने दिल्ली गाठली आणि सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवली आणि पुढच्या सुनावणीची तारीख ठरवली आहे. आमदारांच्या अपात्रतेसंबंधित निर्देश देताना यावर पुढच्या दोन सुनावणीपूर्वी नेमकी काय कारवाई केली याची माहिती अध्यक्षांनी द्यावी.

अशा पद्धतीने अनिश्चित काळ काम करू शकत नाही, किती वेळेत काम करणार याचे टाईम टेबल विधानसभा अध्यक्षांनी द्यावे असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आता त्यानंतर सोमवारी सुनावणी होताना टाईम टेबल विधानसभा अध्यक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे असणर आहे.

आता याच प्रकरणात महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दोन प्रतिस्पर्धी गटांतील ५४ शिवसेना आमदारांना नव्याने नोटीस बजावून आज दुपारी ३ वाजता विधानभवनात सुनावणीसाठी बोलावले आहे. तरी या सुनावणीत या प्रकरणाच्या प्रक्रियेची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणातील सुनावणीचं वेळापत्रक समोर येण्याची शक्यता आहे. त्या वेळापत्रकानुसार या प्रकरणातील सुनावणी प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठावा केल्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले होते, शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत महाविकास आघाडी सरकार पाडण्यात मोठी भुमिका बजावली होती. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

यानंतर ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलेल्या आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर शिंदे समर्थक आमदारांकडून देखील याचिका दाखल करण्यात आली होती.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या