Thursday, June 13, 2024
Homeमुख्य बातम्याMLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांसमोर 'ईमेल'वरून दोन्ही गट भिडले; नेमकं काय...

MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांसमोर ‘ईमेल’वरून दोन्ही गट भिडले; नेमकं काय घडलं ?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

ठाकरे आणि शिंदे गट (Thackeray and Shinde group) आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीवेळी शिंदे गटाच्या वकिलांनी गेल्या सुनावणीवेळी जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत (Advocate Devdutt Kamat) यांनी युक्तिवाद केला. यावेळी दोन्ही गटांत पुरावे परत सादर करण्यावरुन चांगलेच घमासान झाल्याचे पाहायला मिळाले…

Maratha Reservation : “मराठ्यांनी ठरवलं तर…”; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

आज ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी पहिल्यांदा युक्तिवाद (Argument) केला. यावेळी त्यांनी नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाही. गेल्या सुनावणीत आपण अर्ज दाखल केला होता, असे म्हटले. त्यानंतर अध्यक्षांनी मला मर्यादित वेळेत ही सुनावणी घ्यायची आहे, असे वक्तव्य केलं. त्यानंतर दोन्ही गटाच्या वकिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. जे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहेत, त्याला माझा विरोध नाही. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे (Thackeray Group) वकील देवदत्त कामत यांनी केली.

Maratha Reservation : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची घेणार भेट

तसेच ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाला मेलवर व्हीप मिळाल्याचा पुरावा आहे, असे म्हटले. मात्र, आम्हाला कोणताही मेल किंवा माहिती मिळाली नव्हती, असे शिंदे गटाचे वकील म्हणाले. तसेच शिंदे गटाला व्हीप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ईमेल आयडीवर पाठवला. त्यामुळे संबंधित ईमेल आयडी आपला नाही असे त्यांनी सांगितल्यास हे गंभीर आहे. आयटी तज्ज्ञांकडून तपासणी करावी लागेल. तसेच याप्रकरणात कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते, असे ठाकरे गटाचे वकील कामत यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut : “…तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”; PM मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचा हल्लाबोल

यावेळी देवदत्त कामत यांनी एक मिश्लिक टिप्पणी देखील केली. ते म्हणाले की “महेश शिंदे यांना स्पेशल ईमेल आयडी मिळाला आहे का? महेश शिंदे यांनी महेश शिंदे ००३ असा मेल आयडी दिला. हा कुठला आयडी आहे? असे म्हटले. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या मतदानासाठी मविआकडून राजन साळवी यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी साळवींना मत द्यावे यासाठी व्हिप जारी केला होता. त्यासाठी मेल पाठवला होता”, असेही ठाकरे गटाचे वकील कामत यांनी सांगितले.

Shah Rukh Khan birthday : ‘किंग खान’च्या वाढदिवसानिमित्त ‘मन्नत’बाहेर चाहत्यांकडून जंगी सेलिब्रेशन

दरम्यान, त्यानंतर दोन्ही गटांनी यावर पुरावे सादर करण्यास सहमती दर्शवली. तसेच फेरसाक्ष घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker Rahul Narvekar) यांनी देखील याला सहमती दर्शवली. त्यामुळे आता पुरावे सादर करण्यास वेळ दिला जाणार असून सुधारीत वेळापत्रकानुसार पुढची प्रक्रिया ठरणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

IND vs SL : रोहित सेना आज श्रीलंकेशी भिडणार; भारताला उपांत्य फेरी गाठण्याची संधी

- Advertisment -

ताज्या बातम्या