Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Elections 2024 : "बाळासाहेब असते तर त्यांनी…"; आमदार सदा सरवणकर...

Maharashtra Assembly Elections 2024 : “बाळासाहेब असते तर त्यांनी…”; आमदार सदा सरवणकर यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली, पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माहिमच्या जागेवरून महायुतीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी सदा सरवणकर यांनी अर्ज भरू नये, अशी विनंती भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सदा सरवणकर यांना करण्यात आली, पण तरीही सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून मनसेचे अमित ठाकरे यांना पाठिंबा मिळावा यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत. पण महायुतीकडून शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सदा सरवणकर गेल्या १५ वर्षांपासून या मतदारसंघात आमदार आहेत. ते तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पण आता मनसेकडून आणि महायुतीच्या नेत्यांकडून या निवडणुकीत सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. कारण सदा सरवणकर यांनी स्वत: ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले सदा सरवणकर?
‘मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो. बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितले नसते. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर – माहिम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते. एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या’, असे सदा सरवणकर म्हणाले आहेत.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : ‘वारसां’ना किती मिळणार मतदारांची ‘पसंती’?

0
नाशिक | विजय गिते | Nashik महानगरपालिका निवडणूक (Mahapalika Election) म्हटले की, केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर स्थानिक समीकरणे, आरक्षणाचे गणित आणि राजकीय वारसा यांचीही...