Thursday, October 31, 2024
Homeब्रेकिंग न्यूजShrinivas Vanga : ३६ तासांपासून नॉटरिचेबल असलेले श्रीनिवास वनगा मध्यरात्री घर वापसी!...

Shrinivas Vanga : ३६ तासांपासून नॉटरिचेबल असलेले श्रीनिवास वनगा मध्यरात्री घर वापसी! म्हणाले, उमेदवारी न मिळाल्याने…

मुंबई | Mumbai
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा ३६ तासांनंतर घरी परतले. पालघर विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज झाले आणि घर सोडून निघन गेले होते. तब्बल ३६ तासांपासून त्यांचे दोन्ही फोन नॉटरिचेबल होते. श्रीनिवास वनगा यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबीय चिंतेत आले होते. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास आमदार श्रीनिवास वनगा हे आपल्या घरी येऊन पुन्हा माघारी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उमेदवारी दिली नसल्याने मी व्यथीत झालो आहे आणि त्यामुळे मला आरामाची गरज आहे, असे सांगून श्रीनिवास वनगा आपल्या काही मित्रांसोबत पुन्हा माघारी गेल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी नाकारल्यानंतर धक्का बसलेल्या श्रीनिवास वनगा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भावूक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे वनगा यांच्या कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. तसेच पोलीसही त्यांचा शोध घेत होते.

- Advertisement -

मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास आमदार श्रीनिवास वनगा हे आपल्या तलासरीतील कवाडे येथील घरी येऊन पुन्हा माघारी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उमेदवारी दिली नसल्याने मी व्यथीत झालो आहे आणि त्यामुळे मला आरामाची गरज आहे असे सांगून श्रीनिवास वनगा आपल्या काही मित्रांसोबत पुन्हा माघारी केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे नॉट रिचेबल असलेले वनगा आता कुटुंबीयांच्या संपर्कात आल्याचे दिसून आले. यामुळे कुटुंबीय, पोलिसांची चिंता आता काहीशी कमी झाली आहे. मात्र घरी परतलेले वनगा आपल्या मित्रांसोबत परत कुठे गेले हे आपल्या पत्नीला देखील त्यांनी सांगितलेले नाही. तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा आता यापुढे आपली राजकीय भूमिका काय घेतात हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

दरम्यान, महायुतीच्या जागावाटपामध्ये पालघरची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटल्याने तिथून विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र ऐनवेळी येथे श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे श्रीनिवास वनगा हे नाराज झाले होते. तसेच तू मतदारसंघात निवडून येत नाही, तुझ्याबाबतीत नकारात्मक अहवाल आलाय हे कारण देऊन मला मागेही थांबवले, मी प्रामाणिकपणे थांबलो. प्रत्येक वेळी गावितांना तिकिट दिले. जेव्हा जेव्हा चांगली संधी येते, मी चांगले काम केले तरीही मला डावलण्यात आलं असं सांगत आमदार श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या